Kharif season : खरीप हंगामासाठी ५८ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज
Fertilizer availability
Kharif season : खरीप हंगामासाठी ५८ हजार मेट्रिक टन खतांची मागणीpudhari photo
Published on
Updated on

Demand for 58,000 metric tonnes of fertilizers for the Kharif season

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर तालुक्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा व उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. तालुक्यासाठी विविध रासायनिक खतांची एकूण ५१ हजार ४४७ मेट्रिक टन मागणी नोंदविण्यात आली असून, मंजूर आवंटन प्रक्रियाही सुरू आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने नियोजन व गुणवत्ता नियंत्रणावर भर दिला आहे.

Fertilizer availability
खरीप हंगामासाठी खत-बियाण्यांचे नियोजन पूर्ण

तालुक्यात खरीप हंगामासाठी युरिया १९ हजार ६६० मेट्रिक टन, डीएपी ६ हजार १५७ मेट्रिक टन, एमओपी ३ हजार ४३४ मेट्रिक टन,एनपीके १८ हजार ४५४ मेट्रिक टन तर एसएसपी ३ हजार ७४३ मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. एकूण खत मागणी ५१ हजार ४४७मेट्रिक टन इतकी आहे.

दरम्यान, तालुक्यासाठी मंजूर खत आवंटनामध्ये युरिया १४ हजार ७९ मेट्रिक टन, डीएपी २ हजार ८६० मेट्रिक टन, एमओपी ६५० मेट्रिक टन, एसएसपी ४ हजार ५६४ मेट्रिक टन आणि एनपीके संयुक्त खते १५ हजार ८९९ मेट्रिक टन मंजूर करण्यात आले आहे. एकूण ५८ हजार ८३० मेट्रिक टन खतांची मागणी असताना ३८ हजार ५१ मेट्रिक टन मंजूर आवंटन करण्यात आल्याचे समोर आले आहे. मार्च २०२६ अखेर तालुक्यात युरियाचा ३ हजार ७७मेट्रिक टन तर डीएपीचा १ हजार ४७२.६४ मेट्रिक टन शिल्लक साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

Fertilizer availability
अनियमितता करणाऱ्या ६४ दुकानांवर टाच

१४ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

खत विक्री व गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. सन २०२५-२६ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत १४ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येवून नऊ कृषी सेवा केंद्रांचे निलंबन, एक केंद्र कायमस्वरूपी बंद, तसेच दोन प्रकरणांत विनापरवाना खत निर्मिती कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

एप्रिल २०२६ मध्ये तालुक्यातील १८ कृषी सेवा केंद्रे निलंबित करण्यात आली असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभाग अधिक सतर्क आहे.
संदीप शिरसाठ, तालुका कृषी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news