Vaijapur News : धरणे कोरडीठाक : आता कसरत पिण्याच्या पाण्यासाठी!

वैजापूर तालुक्यात अवैध पाणी उपशावर प्रशासनाचा बडगा
Vaijapur News
Vaijapur News : धरणे कोरडीठाक : आता कसरत पिण्याच्या पाण्यासाठी!file photo
Published on: 
Updated on: 

Dams dry up: Now it's time to work for drinking water

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात दुष्काळाचा तीव्र फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिके करपून अतोनात नुकसान झाल्यानंतर आता वैजापूर तालुक्यासमोर पिण्याच्या पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

Vaijapur News
Jalna News : आजपासून जालना शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

विहिरींनी आधीच तळ गाठला असताना, आता तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठाही कमालीचा घटल्याने प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे. उरले-सुरले पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात यावे, अशा स्पष्ट आणि कडक सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.

या आदेशाची गांभीर्याने दखल घेत पाटबंधारे विभागाने तातडीने अवैध पाणी उपशावर कारवाई करत कनेक्शन बंद केले आहे. तालुक्यातील बिलोणी, जरुळ, कोल्ही, खंडाळा हे लघु प्रकल्प आणि मन्याड साठवण तलाव आधीच शून्यावर आले आहेत. तसेच नारंगी, बोरदहेगाव हे मध्यम प्रकल्प, गाढेपिंपळगाव व सटाणा हे लघु प्रकल्प आणि इतर प्रकल्पांमधील उरलेला अल्पसा जलसाठा आता केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आला आहे.

या कारवाईमुळे धरणांमधील पाण्याचा शेतीसाठी किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी होणारा बेकायदेशीर वापर थांबला असून, आगामी तीव्र पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा साठा जतन करणे शक्य होणार आहे.

Vaijapur News
Jalna News : डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप
"विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अवैध पाणी उपसा पूर्णपणे बंद केला आहे. उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवला असून, नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा."
पवन चव्हाण, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, वैजापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news