Crop Panchnama : मराठवाड्यात एकूण १३.१५ लाख हेक्टरवर पीक पंचनामे पूर्ण

विभागात जालना जिल्ह्यात सर्वाधिक ४६.९० टक्के, आतापर्यंत २५.१४ टक्के काम पूर्ण
Crop Panchnama
मराठवाड्यात एकूण १३.१५ लाख हेक्टरवर पीक पंचनामे पूर्णfile photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आऑगस्ट, सप्टेंबर अशी दोन महिने कोरडी गेली. त्यामुळे खरीप पीक हातून गेले असून राज्य शासनाने विभागात ट्रिगर-१ लागू करीत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यात आतापर्यंत मराठवाड्यात ५२ लाख ३२ हजार ४७३ हेक्टरपैकी ३ हजार ५८६ गावांतील १३ लाख १५ हजार २५६ हेक्टर क्षेत्रावरील म्हणजेच २५.१४ टक्के क्षेत्रातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Crop Panchnama
Gangapur News : शाळेतील शिपायाला पोक्सो प्रकरणात सात वर्षे सश्रम कारावास

विभागात सर्वाधिक ४६.९० टक्के पंचनामे जालन्यात पूर्ण झाले आहेत. मराठवाड्यात यंदा जून, जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी केली. परंतु, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी दोन महिने पावसाने दीर्घ काळ दडी मारली. ऐन पिके वाढीच्या अवस्थेत असताना विविध मंडळांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला.

सोयाबीन, कापूस, मका यांसह विविध खरीप पिकांचे नुकसान झाले. पर्जन्यतूट आणि अन्य निकषांच्या आधारे विभागातील ७४ तालुक्यांमध्ये प्रथम कळ लागू झाली असून दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पावसाअभावी केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.

Crop Panchnama
Youth Festival : तलाव, विहिरी झाल्या सुन्या सुन्या... आता तरी पड रे पाण्या...

उन्हाळ्यापासून टँकरवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यातही टँकर सुरूच राहिले. आता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि अगामी ब्बी हंगामातील पीक घेता यावे, यासत्तठी पीक नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राची निश्चित आकडेवारी उपलब्ध होऊन त्यानुसार मदतीची प्रक्रिया पुढे जाणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news