Youth Festival : तलाव, विहिरी झाल्या सुन्या सुन्या... आता तरी पड रे पाण्या...

केंद्रीय महोत्सवातील शोभायात्रेत युवक कलावंताची वरुणराजाला साद
Youth Festival
Youth Festival : तलाव, विहिरी झाल्या सुन्या सुन्या... आता तरी पड रे पाण्या... file photo
Published on: 
Updated on: 

Young artist Rain central Youth Festival procession

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातील युवा कलावंतानी तलाव, विहिरी झाल्या सुन्या सुन्या... आता तरी पड रे पाण्या... अशी आर्त हाक वरुणराजाला दिली. मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचे चित्रण सोमवारी (दि.५) युवक महोत्सवातील शोभायात्रेत सहभागी कलावंतानी केले.

Youth Festival
Congress March : दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेसचा लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव ५ ते ७ ऑक्टोबर या काळात विद्यापीठ परिसरात सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने होत असलेल्या या महोत्सवात १०७महाविद्यालयने सुमारे साडे सहाशे कलावंत सहभागी झाले आहेत.

केंद्रीय युवक महोत्सवाची सुरुवात छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. संजय कवडे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, डॉ. अंकुश कदम, डॉ. अर्पणा पाटील यांनीही सहभाग घेतला.

Youth Festival
Digital Arrest : निवृत्त महिला बँक कर्मचारी ८ दिवस डिजिटल अरेस्ट ; १३ लाखांचा गंडा

दुष्काळाची गंभीरता

युवा संत रामदास महाविद्यालय घनसावंगी या संघानी पड रे पाण्या या विषयावर सादरीकरण केले. या सादरीकरणांतून त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता रेखाटली. शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ते नाट्यगृह अशी काढण्यात आली. दुष्काळी परिस्थितीचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातील युवा कलावंतानी अनेक फलक हातात घेतले होते.

शोभायात्रेत विविध महाविद्यालयांचा सहभाग

शोभायात्रेत स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा, मोरेश्वर महाविद्यालय-भोकरदन, कर्मवीर जगदाळे महाविद्यालय वाशी, मत्स्योदरी महाविद्यालय-अंबड, अंकुशराव टोपे महाविद्यालय-जालना, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, जवाहर महाविद्यालय-अणदूर, संत रामदास महाविद्यालय - घनसावंगी, र. ब. अट्टल महाविद्यालय - गेवराई, देवगिरी महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय-जालना, एम.पी. विधी महाविद्यालय, के. एस. के. महाविद्यालय बीड, स्वामी रामानंद तीर्थ - अंबाजोगाई, आदर्श महाविद्यालय-उमरगा, विद्यापीठ उपपरिसर धाराशिव, दगडोजीराव देशमुख -वाळूज, भानुदासराव चव्हाण-लोहारा व सरस्वती भुवन कला-वाणिज्य महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news