Government Land : सरकारी जमिनी बळकावल्यास होणार गुन्हे दाखल

जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सरकारी वर्ग २ च्या जमिनी बळकावून त्या परस्पर विक्री करण्यात आल्या आहेत.
Government Land
Government Land : सरकारी जमिनी बळकावल्यास होणार गुन्हे दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

Criminal cases will be filed for encroaching upon government land

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सरकारी वर्ग २ च्या जमिनी बळकावून त्या परस्पर विक्री करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने गायरानसह खिदमतमासचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये आता सरकारची फसवणूक करणाऱ्यांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. १४) पत्रकारांशी बोलताना दिला.

Government Land
Sambhajinagar News : वाटणीपत्राआधारे तब्बल १०० एकरची प्लॉटिंग

विभागीय आयुक्तालयासमोरील गट नंबर ३४ मधील जागा सरकारी वर्ग २ ची जमीन असल्याची माहिती विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या जागेसह आयुक्तालयालगतच्या सर्वच जागांचा १९५५ सालापासूनचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यासाठी एसआयटी नियुक्त केली. या एसआयटीला गट नंबर ३४ बाबत बहुतांश माहिती प्राप्त झाली आहे.

एवढेच नव्हे तर महत्त्वाचे रेकॉर्ड देखील यात गहाळ झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी मंगळवारी या जागेबाबत आढावा बैठक घेतली. सरकारी जमिनी बळकावून त्या विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी दिला आहे. खिदमतमास जमिन प्रकरणात सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत.

Government Land
Congress Protest : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख अनुदान द्या

काही ठिकाणी सातबाऱ्यामध्ये हेराफेर केल्याची बाबी समोर येत आहेत. त्यावर प्रशासन माहिती संकलन करीत आहे. विभागीय आयुक्तालयालगतच्या व समोरील जागेचा रेकॉर्ड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून मागविला आहे. दिल्ली गेट परिसरातील गटनं. ३४ मधील जागेच्या मालकीबाबत पूर्ण माहिती मागविली आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news