Crime News : एकाच दिवसात दागिने चोरीच्या दोन घटनांनी वैजापुरात खळबळ

अंगण झाडणाऱ्या महिलेचे गंठण हिसकावले, चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
sambhajinagar Crime News
Crime News : एकाच दिवसात दागिने चोरीच्या दोन घटनांनी वैजापुरात खळबळfile photo
Published on
Updated on

Crime News: Two incidents of jewelery theft in one day created excitement in Vaijapur

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर शहरात चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याचे चित्र सोमवारी (दि.१३) पाहायला मिळाले. भरदिवसा महिलांना लक्ष्य करत दागिने चोरीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने शहरातील कायदा-युव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

sambhajinagar Crime News
Beed Crime | पुन्हा एकदा दिवसाढवळ्या महिलेचे मंगळसूत्र ओरबडले; पोलिसांचा ‘नो रिस्पॉन्स’, नागरिकांमधून तीव्र संताप

एका घटनेत घरासमोर अंगण झाडणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोन्याचे गंठण हिसकावण्यात आले, नर दुसऱ्या घटनेत बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील सोन्याची माळ लंपास करण्यात आली. सलग दोन घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात चोरट्यांचा वावर वाढल्याची चर्चा सुरू आहे.

पहिल्या घटनेत शहरातील चंद्रपालनगर परिसरातील नम्रता वाकले या सोमवारी सकाळी घरासमोर अंगण झाडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १४ ग्रॅम वजनाचे, ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण क्षणार्धात हिसकावून पळ काढला. वाकले यांनी आरडाओरड करून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे पसार झाले.

sambhajinagar Crime News
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

दुसऱ्या घटनेत रुक्मिणी काळे या वैजापूर बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून अडीच तोळे वजनाची, सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ चोरून नेली. बसमध्ये बसल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

दोन्ही प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा धाक उरला आहे का ?

एकाच दिवसात शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारला गेला. पहिली घटना घरासमोर, तर दुसरी बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडली. यामुळे चोरटे कोणत्याही भीतीशिवाय भरदिवसा गुन्हे करत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात पोलिसांची गस्त, नाकाबंदी आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना किती प्रभावी आहेत, असा प्रश्न या घटनांमुळे उपस्थित होत आहे. घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान आता वैजापूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news