

Crime News: Married woman dies; case registered against husband and father-in-law
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
एकोणीस वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी (दि. २१) रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात पती, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी (दि. २०) सकाळी विवाहित महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. ही घटना तालुक्यातील पळशी येथे घडली होती.
करुणा सुभाष निकम (१९) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी पती सुभाष गौतम निकम, सासरा गौतम हरिभाऊ निकम (दोघे रा. पळशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहिता व पती सुभाष गौतम निकम सकाळी घर ाजवळील शेतातील विहिरीवर पाण्यासाठी गेले. पती भांड भरून घरी आला. पत्नी पाठीमागे न दिसल्याने पतीने तातडीने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीच्या पाण्यात बुडबुडे येत असल्याने शंका आली व पतीने विहिरीत उडी मारली. मात्र तेथील डॉक्टरांनी विवाहितेला मृत असल्याचे घोषित केले.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी मृत महिलेचे वडील दीपक अशोक सोनवणे (रा. नेपानगर, मध्यप्रदेश, ह. मु. रा. घोसला ता. सोयगाव) यांनी तक्रार दिली. लग्नात ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र पैसे न दिल्याने पती, सासरा मुलीला मानसिक त्रास देत छळ करीत होते. या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली.