Crime News : पुंडलिकनगरात गुन्हेगाराचा तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

जुन्या भांडणाची कुरापत काढून सराईत गुन्हेगाराने एका तरुणावर चाकूने सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
Crime
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Crime News: Criminal fatally attacks youth with knife in Pundaliknagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

जुन्या भांडणाची कुरापत काढून सराईत गुन्हेगाराने एका तरुणावर चाकूने सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि.१६) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर रोडवरील पालखी हॉटेलजवळ घडली. या हल्ल्यात कुणाल कल्याण खंडागळे (२१) हा गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत राजेंद्र आवारे (रा. जयभवानीनगर, गल्ली क्र. १४) असे आरोपीचे नाव आहे. तो अद्याप पुंडलिकनगर पोलिसांना सापडलेला नाही.

Crime
जिथे पोलिसांनाच मदत मिळेना तिथे सर्वसामान्यांचे काय ?

याप्रकरणी जखमी कुणालचा भाऊ स्वप्निल खंडागळे (२४, रा. जय भवानीनगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि.१६) रात्री १०:३० च्या सुमारास फिर्यादी स्वप्निल, त्याचा भाऊ कुणाल आणि मित्र कृष्णा पुरी हे पुंडलिकनगर रोडने जात होते. पालखी हॉटेलजवळ ते कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी थांबले असता, तेथे प्रशांत आवारे आला.

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या एका वादाचा राग मनात धरून त्याने कुणालला तू येथे काय करतोय? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर प्रशांतने त्याच्याजवळील चाकूने कुणालच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर डाव्या बाजूला गंभीर वार केले.

Crime
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

जम माझ्याविरुद्ध पोलिस तक्रार केली, तर तुम्हा सर्वांना जिवंत मारून टाकू, अर्शी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुणालला तातडीने आधी एमआयटी आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news