

Cousin mother-in-law steals daughter-in-law's jewelry to pay off debt
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
कर्जबाजारीी झालेल्या चुलत सासूने नवविवाहितेचे सुमारे १४ लाख २० हजार रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना १३ ते २७डिसेंबर-२०२४ दरम्यान सहकार बँक कॉलनीत घडली. अर्चना पंकज देशमुख आणि गौरी ऊर्फ मानसी देशमुख (दोघी रा. चाळीसगाव) अशी दागिने चोरणाऱ्या नातेवाईकांची नावे असून त्यांच्याविर- ोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुचित्रा संजय देशमुख (५४, रा. सहकार बँक कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तिच्या सुनेला लग्नात मिळालेले दागिने तिने माहेरहून ६ डिसेंबर रोजी आणले होते. हे दागिने तिने बेडरुममध्ये ठेवले होते. १३ डिसेंबर रोजी माझी जाऊ अर्चना पंकज देशमुख व तिची मुलगी मानशी ऊर्फ गौरी देशमुख सकाळी घरी आल्या व थेट बेडरुममध्ये गेल्या. दरम्यान २७डिसेंबर रोजी दागिन्यांची बॅग जागेवर नसल्याने एकच गोंधळ उडाला. या खोलीत अर्चना आणि मानसी व्यतिरिक्त कोणीही गेले नसल्याचे समोर आले.
चोरीला गेलेला ऐवज
सोन्याचे गंठण, बांगड्या, राणीहार, नेकलेस, झुंबर, अंगठी, कानातले दागिने तसेच चांदीचा 'बरपट्टा, पैंजन असा सुमारे १४ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज होता.
दागिने घेतल्याची कबुली ?
या बाबत फोना फोनी केली असता अर्चना देशमुख यांनी दागिने घेतल्याची कबुली दिली. कर्ज फेडण्यासाठी हा उपद्रव केल्याचेही समोर आले. यावर नातेवाईकांतर्गत बैठकीत घेतली त्यावेळी अर्चनाचे पती पंकज देशमुख यांनी बँकेत गहाण ठेवलेली शेती सोडवून पीडितेच्या नावे करण्याचे आश्वासन दिले.
दागिने देण्यास नकार
नातेवाईकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे काहीच झाले नाही. उलट चोरलेले दागिने देण्यास अर्चनाने नकार दिला. त्यामुळे सुचित्रा देशमुख यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून त्या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास निरीक्षक सचिन कुंभारे करीत आहेत.