

Raksha Bandhan: From blood ties to social commitment
भाग्यश्री जगताप छत्रपती संभाजीनगर : बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सण रक्षाबंधन घरोघरी उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र काळानुसार रक्षाबंधनाचं स्वरूप बदलत चालले आहे. रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित असलेला हा सण आता समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता, सन्मान आणि संरक्षणाचं वचन देणारा उत्सव बनला आहे. बहीण-भावाच्या प्रेमाच्या प्रतीकाबरोबरच सैनिक, पोलिस, डॉक्टर, शिक्षक अशा अनेकांना राखी बांधून आपुलकीची डोर घट्ट केली आहे.
रक्षाबंधन ही भारतीय संस्कृतीतील प्रेम, सन्मान आणि संरक्षणाचं प्रतीक असलेली अन- ोखी परंपरा आहे. पूर्वी केवळ बहीण-भावामधील नात्यावर आधारित असलेला हा उत्सव आता बदलत्या काळानुसार अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक रूपं धारण करत आहे. आजच्या काळात बहिणी केवळ भावालाच नव्हे, तर समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनाही राखी बांधतात.
सैनिक, पोलिस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान यांना राखी बांधून त्यांचं संरक्षण व सेवाभावाबद्दल आभार व्यक्त करण्याची प्रथा वाढली आहे. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्था या माध्यमातून रक्षाबंधनाला मसामाजिक बांधिलकीफची जोड दिली जाते. व्यावसायिक पातळीवरही रक्षाबंधनात मोठा बदल दिसतो. ऑनलाइन राखी पाठवणे, वैयक्तिक नावं किंवा फोटो असलेल्या राख्या, थीम-आधारित गिफ्ट्स अशा संकल्पना लोकप्रिय झाल्या आहेत. जरी काहीजण या व्यापारीकरणावर टीका करत असले तरी, यामुळे सणाचा प्रसार जगभरात झाला आहे.
भाऊ-बहिणीचे एकमेकांना संरक्षणाचं वचन
लिंगसमानतेचंही दर्शन या सणातून घडत आहे. काही ठिकाणी बहिणी भावांना राखी बांधण्याबरोबरच भाऊ-बहीण एकमेकांना मसंरक्षणाचं वचनफदेतात. महिलांनी महिलांना किंवा पुरुषांनी पुरुषांना राखी बांधण्याच्या उपक्रमांतून मसुरक्षा सर्वांची जबाबदारीफहा संदेश पोहोचवला जातो.