Bribe Case : लाचखोर आयकर अधिकाऱ्याला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

भदानी हा जळगाव येथील आयकर विभागाच्या वॉर्ड क्रमांक २ (२) मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होता.
Bribe Case
Bribe Case : लाचखोर आयकर अधिकाऱ्याला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षाfile photo
Published on: 
Updated on: 

Corrupt Income Tax officer sentenced to five years of rigorous imprisonment

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आयकर विवरणपत्रांची सविस्तर तपासणी न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून त्यातील ४० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन आयकर अधिकारी तथा आरोपी सतीशकुमार भदानी याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुलकर्णी यांनी पाच वर्षांच्या सक्तमजुरी आणि एकूण दीड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

Bribe Case
Municipal Health Department Recruitment : महिला उमेदवारांना मुलाखतीपासून रोखले

आयकर दायित्वाशी संबंधित गैरवर्तनाचा परिणाम राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे जबाबदार करसंकलन विभागातील भ्रष्टाचाराकडे अवाजवी सहानुभूतीने पाहता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

भदानी हा जळगाव येथील आयकर विभागाच्या वॉर्ड क्रमांक २ (२) मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होता. चारचाकी वाहनांचे गॅरेज चालविणारे आणि स्थावर मालमत्तेचे व्यवहार करणारे उन्मेष बाळकृष्ण पाटील यांना २०१६ मध्ये आयकराची मागणी नोटीस बजावण्यात आली होती. पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या विवरणपत्रांची सविस्तर छाननी न करण्यासाठी भदानी याने ६० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप होता.

पाटील यांनी २३ सप्टेंबर २०१६ रोजी सीबीआयकडे तक्रार केली. भदानी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करूनपैशांची मागणी करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयने भदानी यांच्या कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी ४० हजार रुपये स्वीकारल्याचे न्यायालयीन सुनावणीत निष्पन्न झाले.

Bribe Case
Heritage Walk : विद्यार्थ्यांनी अनुभवला बीबी का मकबरा 'हेरिटेज वॉक'

दोन कलमांत शिक्षा

खटल्याच्या सुनावणी वेळी सीबीआयचे विशेष सरकारी वकील डी. एन. म्हस्के यांनी युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयाने भदानी याला दोषी ठरवून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७अंतर्गत चार वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर कलम १३(१) (ड) व १३ (२) अंतर्गत पाच वर्षांची सक्तमजुरी व एक लाख रुपये दंड ठोठावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news