Heritage Walk : विद्यार्थ्यांनी अनुभवला बीबी का मकबरा 'हेरिटेज वॉक'

विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, स्थापत्य आणि संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
Heritage Walk
Heritage Walk : विद्यार्थ्यांनी अनुभवला बीबी का मकबरा 'हेरिटेज वॉक'file photo
Published on: 
Updated on: 

Students experienced the Bibi Ka Maqbara 'Heritage Walk'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक पर्यटन दिनानिमित्त 'टीम शहरनामा' आणि विविध संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जगप्रसिद्ध बीबी का मकबरा येथे मंगळवारी विशेष हेरिटेज वॉकचे (वारसा फेरी) आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

Heritage Walk
Crop Panchnama : पीक पंचनाम्यांचे दैनंदिन अहवाल पाठवा

इतिहास व पुरातत्त्व विभाग (एमजीएम विद्यापीठ), आख्यान फाउंडेशन, गरवारे कम्युनिटी सेंटर, अॅडगाइड मीडिया आणि केंद्रीय पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही फेरी पार पडली. विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, स्थापत्य आणि संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी पुरातत्त्वज्ञ प्रा. आशुतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना वास्तूचा इतिहास, मध्यवर्ती घुमट, मिनार, संगमरवरी जाळ्या आणि जलव्यवस्थापनाची माहिती दिली. औरंगजेबाची पत्नी दिलरस बानू बेगम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही वास्तू उभारण्यात आली होती.

तसेच ताजमहाल आणि बीबी का मकबरा यांच्या बांधकामातील तंत्रज्ञान, कालखंड व साधनांमधील फरक त्यांनी सोदाहरण उलगडून दाखवला. इतिहास केवळ पुस्तकात न राहता तो आजूबाजूच्या वास्तूंमध्ये जिवंत असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाला गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, सहायक निदेशक स्नेहल पाटील, रमाकांत रौतल्ले, ओम परदेशी यांच्यासह शिक्षक व पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संजय रोहणकर यांनी यासाठी विशेष सहकार्य केले.

Heritage Walk
Narcotics : विविध गुन्ह्यांत जप्त ४९ लाखांचे अमली पदार्थ नष्ट

विद्यार्थ्यांना मिळाली इतिहासाची प्रत्यक्ष ओळख

हेरिटेज वॉकमधून विद्यार्थ्यांनी बीबी का मकबऱ्याचा इतिहास, स्थापत्यकला, घुमट, मिनार, संगमरवरी जाळ्या आणि जलव्यवस्थापनाची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली. पुस्तकातील इतिहास वास्तूंच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news