Love Jihad Case : निदा खानला राजकीय आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल नॉट रिचेबल

टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली निदा खानचा नाशिकमधून फरार झाल्यानंतर दाटीवाटीच्या परिसरात राहण्याचा डाव होता.
Nida Khan arrested TCS case
नगरसेवक मतीन पटेल आणि निदा खानpudhari photo
Published on
Updated on

Corporator Matin Patel, who gave political asylum to Nida Khan, is not reachable

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली निदा खानचा नाशिकमधून फरार झाल्यानंतर दाटीवाटीच्या परिसरात राहण्याचा डाव होता. मात्र पोलिस मागावर असल्याने तिने थेट राजकीय आश्रय शोधल्याचे समोर आले आहे.

Nida Khan arrested TCS case
Nida Khan arrested TCS case : नगरसेवक मतीन पटेलला सोबत घेऊनच रात्री फ्लॅटवर टाकली धाड

दरम्यान, तिला बेड्या पडल्यानंतर गुन्ह्यात थेट नाव आलेले नगरसेवक मतीन पटेलला कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक रविवारी (दि.१०) शहरात दाखल झाले. नियमानुसार ही नोटीस मतीनला प्रत्यक्ष भेटूनच द्यावी लागते. मात्र, मतीन पोलिसांना कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांना प्रत्यक्ष नोटीस बजावण्यात अडचण निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक माहितीनुसार, सुमारे ४० दिवसांपासून फरार असलेली निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातील एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मदतीने एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर मतीन पटेलला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले.

Nida Khan arrested TCS case
Sambhajinagar News : नगरसेवक मतीन पटेलचा 'तो' व्हिडिओ पुन्हा व्हायरल

लव्ह जिहादचे प्रकरण अंगलट येत असल्याने निदा खानने पळून जाण्याचा कट आखला. पोलिसांच्या तपासाचा वेग आणि तांत्रिक माहितीमुळे तिचा हा कट फसला. पोलिसांना चकवा देण्यासाठी ती अगोदर मुंब्रा, भिवंडी, ठाणे, सोलापूर येथे गेली. पोलिस पिच्छा सोडत नसल्याचे पाहून तिने राजकीय आश्रय घेतला. छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथील नगरसेवक मतीन पटेलच्या मदतीने ती दाटीवाटीच्या वस्तीत राहत होती. पळून जाण्याचा प्लॅन फसल्याने ती हैराण झाली. ऐनवेळी निदा खानने राजकीय नेत्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात ती आणि तिला मदत करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकत गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news