Drought : कन्नडच्या दुष्काळावरून सोशल मीडियावर वादंग

दुष्काळग्रस्तांच्या यादीवरून आरोप-प्रत्यारोप; आ. संजना जाधव, माजी आ. हर्षवर्धन जाधव आमनेसामने
Drought
Drought : कन्नडच्या दुष्काळावरून सोशल मीडियावर वादंगfile photo
Published on
Updated on

Controversy on social media over Kannada drought

कन्नड, पुढारी वृत्‍तसेवा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कथित यादीवरून सोशल मीडियावर वादंग निर्माण झाला आहे. या यादीत कन्नड-सोयगाव तालुक्याचे नाव नसल्याने शेतकरी व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Drought
Soybean Crop Damage : शेंगा न लागल्याने २ एकर सोयाबीन जनावरांच्या हवाली

दरम्यान, कन्नड तालुक्याचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून तालुका वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार संजना जाधव यांनी व्यक्त केला. कृषिमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऑनलाइन सहभागी होऊन कन्नड-सोयगावमधील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान व शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी अधिकृत नसून चुकीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जाधव यांनी केले. कन्नड तालुक्याच्या दुष्काळाच्या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Drought
Sillod News : बॅटरीच्या उजेडात धावली बस, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

तहसील कार्यालयावर मोर्चाचा इशारा

दुसरीकडे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न झाल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या मुद्द्यावरून तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात आंदोलनाची दिशा काय राहणार, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news