Soybean Crop Damage : शेंगा न लागल्याने २ एकर सोयाबीन जनावरांच्या हवाली

पावसाने दोन महिने दडी मारल्याने कर्ज काढून केलेली पेरणी वाया
Soybean Crop Damage
Soybean Crop Damage : शेंगा न लागल्याने २ एकर सोयाबीन जनावरांच्या हवालीfile photo
Published on
Updated on

Two acres of soybean crop handed over to livestock due to failure to set pods

कडेठाण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाअभावी सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याने निराश झालेल्या अल्पभूधारक शेतकरी मोहन तवार यांनी दोन एकर सोयाबीन पीक जनावरांच्या हवाली केले. बैल, मेंढ्या व शेळ्या शेतात सोडल्यानंतर उरलेल्या पिकावर नांगर फिरवून शेत मोकळे केले.

Soybean Crop Damage
Crops Damaged : सिल्लोड तालुक्यात ७० टक्के पिकांचे नुकसान

खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. बियाणे, खते आणि मशागतीसाठी अनेकांनी कर्ज काढून खर्च केला. मात्र, पेरणीनंतर पावसाने सुमारे दोन महिने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा संपला. सोयाबीनची वाढ खुंटली असून शेंगा लागण्याच्या कालावधीतही पाऊस न झाल्याने उत्पादनाची शक्यता मावळली आहे.

मोहन तवार यांनी दोन एकरांत सोयाबीनची पेरणी केली होती. पिकाला शेंगा लागण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पीक तसेच वाळून जाण्यापेक्षा जनावरांच्या उपयोगी यावे, या भावनेतून जनावरे शेतात सोडली. त्यानंतर नांगर फिरवून जमीन मोकळी केली. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे संकटात सापडला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Soybean Crop Damage
Waluj Mahanagar : रांजणगाव येथे स्वच्छता नियोजनावर भर; कचरामुक्त गावाचा संकल्प

कर्जफेडीचे संकट

उत्पादनच हाती न आल्याने पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कडेठाण परिसरातील अनेक गावांत सोयाबीनची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके करपली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news