Sillod News : बॅटरीच्या उजेडात धावली बस, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

आमठाणा-मुर्डेश्वर रस्त्यावरील प्रकार; हेडलाईट बंद पडल्याने चालकाची कसरत
Sillod News
Sillod News : बॅटरीच्या उजेडात धावली बस, प्रवाशांच्या जीवाशी खेळfile photo
Published on
Updated on

Bus runs on battery light; passengers' lives put at risk

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : बसचे समोरील हेडलाईट बंद पडल्याने चालकाने चक्क बॅटरीच्या उजेडात जवळपास १० किलोमीटर बस चालविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १८) रात्री आमठाणा-मुर्डेश्वर रस्त्यावर घडला. छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक २ ची ही बस असल्याचे समजते. हेडलाईट बंद असताना प्रवास केल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

Sillod News
Soybean Crop Damage : शेंगा न लागल्याने २ एकर सोयाबीन जनावरांच्या हवाली

छत्रपती संभाजीनगर-मुर्डेश्वर मुक्कामी बस (एमएच ४० एन ९७६३) शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजता आमठाणा येथे पोहोचली असता तांत्रिक बिघाडामुळे तिचे समोरील हेडलाईट बंद पडले. चालकाने दुरुस्तीचा प्रयत्न केला; मात्र हेडलाईट सुरू झाले नाही. त्यामुळे बॅटरीच्या उजेडातच बस मुर्डेश्वरकडे नेण्यात आली. केळगाव-धावडा गावांदरम्यान डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यावर दोन धोकादायक वळणे आहेत.

तसेच आमठाणा-केळगाव चौफुलीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाल्याने सायंकाळी नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हेडलाईटविना बस चालविणे धोकादायक ठरू शकले असते. मात्र चालकाने कसरत करत बस मुर्डेश्वर येथे सुखरूप पोहोचविली.

Sillod News
Gangapur News : शेतकऱ्याची दीड लाखाची बॅग हिसकावली

या प्रकाराबाबत आगार निरीक्षक बाबासाहेब सोळुंके म्हणाले, "चालकाने हेडलाईट बंद पडल्याची माहिती आगार व्यवस्थापकांना देणे गरजेचे होते. मात्र त्याने माहिती दिली नाही. हा प्रकार गंभीर असून, चालकाला विचारणा करून समज देण्यात येईल. भविष्यात याची काळजी घेतली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news