Crop Inspection : पीक पाहणी १५ दिवसांत पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे तलाठ्यांना निर्देश

जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा इतंभूत 'ट्रीगर वन'चा अहवाल गुरुवारी (दि. २४) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला सादर केला आहे.
Crop Inspection
Crop Inspection : पीक पाहणी १५ दिवसांत पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे तलाठ्यांना निर्देशfile photo
Published on: 
Updated on: 

Complete crop inspection within 15 days; Collector's instructions to Talathi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा इतंभूत 'ट्रीगर वन'चा अहवाल गुरुवारी (दि. २४) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला सादर केला आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि तलाठ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत डेडलाईननुसार १५ दिवसातच पीक पाहणी अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले आहेत.

Crop Inspection
Sambhajinagar News : मनपाची १८ थकबाकीदारांवर कारवाई

यावेळी अप्पर जिल्हधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी वेंकट राठोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीची माहिती घेण्यात आली. त्यासोबतच तालुकानिहाय पिकांची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यात आले.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये पावसाअभावी वेगवेगळी स्थिती निर्माण झाली आहे. काही तालुक्यांतील काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण बरे राहिले आहे. त्यामुळे सध्या येथील ८० टक्के पिक सुस्थितीत आहे. परंतु, हलक्या जमिनीवरील पिकांची स्थिती अतिशय बिकट आहे. याच सर्व स्थितीची माहिती प्रत्येक तलाठ्यांनी बांधावर जाऊन घ्यावी.

Crop Inspection
Agriculture News : सोयाबीन, मक्याचे सर्वाधिक नुकसान; बांधावर शेतकऱ्यांचा टाहो

याबाबतचा अहवाल तातडीने तहसिलदारांकडे सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. तर तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत उलट मुदतीत माहिती सादर करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी गौडा यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news