Combing operation : गुन्हेगारी फोफावलेल्या चार ठाण्यांच्या हद्दीत 'कोंबिंग ऑपरेशन'

दोन दिवसांत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ फरार आरोपींच्या आवळल्या मुसक्या
कोंबिंग ऑपरेशन
कोंबिंग ऑपरेशनPudhari News Network
Published on
Updated on

'Combing operation' in the jurisdictions of four police stations where crime is rampant

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने सिडको, एम. सिडको, मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ आणि ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास 'कोंबिंग ऑपरेशन' राबवण्यात आले.

कोंबिंग ऑपरेशन
Jalna Illegal Sand Mining : जिल्ह्यात वाळूमाफियांवर कारवाई; १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतूक व दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण १७ लाख ४५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ५ फरार आरोपींना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सोमवारी (दि.६) दिली.

सिडको आणि एम. सिडको हद्दीत झाडाझडती

३ जुलै रोजी रात्री ७ ते ११ या वेळेत सिडको आणि एम. सिडको हद्दीत २ पोलिस निरीक्षक, २१ अधिकारी आणि १५५ अंमलदारांच्या मोठ्या फौजफाट्यासह धडक कारवाई करण्यात आली. अवैध दारू विक्री व वाहतूक करणारे राजू घोरपडे, अमोल सुतार, राजू बदाने, अनिरुद्ध जाधव, चरणसिंग राजपूत, परमेश्वर पांडे, नितीन शिंदे आणि रितेश थोरात यांच्यावर एकूण ६ गुन्हे दाखल करून ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत १४ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आणि २ फरार आरोपींना अटक करण्यात आली. ४ ठिकाणी नाकाबंदी करून १९४ वाहने तपासण्यात आली व ५८ वाहनांवर कारवाई करत ६५ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोंबिंग ऑपरेशन
Illegal Sand Mining : पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; दोघांवर गुन्हे, ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुकुंदवाडी व पुंडलिकनगरमध्ये १७.३० लाखांची वाळू जप्त

दुसऱ्या दिवशी, ४ जुलै रोजी मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले. यात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू विक्रेते सचिन शिंदे, श्रीराम गायकवाड, गोविंदा पिंपळे आणि पंढरी आघाव यांच्यावर ५ गुन्हे दाखल करत ६ हजार ६४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी १८ सराईत गुन्हेगारांची तपासणी केली, ५ हॉटेल्सची झाडाझडती घेतली आणि ३ फरार आरोपींना अटक केली. नाकाबंदीत २०० वाहनांची तपासणी करून ७६ वाहनांवर ६१ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सराईत गुन्हेगारांची झाडाझडती : ३२

अटक केलेले फरार आरोपी : ०५

अवैध दारू व वाळू कारवाई :

१७ लाख ४५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वाहतूक कारवाई : ३९४ वाहनांची तपासणी; १३४ वाहनांवर १ लाख २६ हजार २५० रुपयांचा दंड.

वॉरंट व समन्स : ४ अजामीनपात्र, ९ जामीनपात्र वॉरंट आणि ३१ समन्सची बजावणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news