Jalna Illegal Sand Mining : जिल्ह्यात वाळूमाफियांवर कारवाई; १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

१६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
Jalna Illegal Sand Mining
जालनाः जिल्ह्यात अवैध वाळूमाफियांविरुध्द कारवाई करून जप्त करण्यात आलेली वाहने व इतर साहित्य. pudhari photo
Published on
Updated on

जालना : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या. चंदनझिरा, घनसावंगी, अंबड, मंठा आणि तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत १ कोटी ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात पोलिस यंत्रणेकडून अवैध वाळू विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे.अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करून १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Jalna Illegal Sand Mining
Jalna illegal sand mining : अवैध वाळूसह 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व घनसावंगी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भेंडाळा शिवारातून विनापरवाना वाळू वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा हायवा (एमएच २१ सीएल ५४५५) पकडला. या कारवाईत २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंठा तालुक्यातील खोरवड शिवारातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ९ ट्रॅक्टर-ट्रॉलींवर पहाटेच्या सुमारास छापा टाकण्यात आला.

Jalna Illegal Sand Mining
Latur Crime | जळकोट पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; दोन हायवा टिपरसह 50.50 लाखांचा मुद्देमाल जप्त!

अशी केली कारवाई

तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५० ब्रास वाळू जप्त करून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या विशेष मोहिमेत ११ वाहने (१ हायवा, १ ट्रॅक्टर व ९ ट्रॅक्टर-ट्रॉली), ५१५ ब्रास वाळू आणि १६ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू व खनिज वाहतुकी विरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणार्‍या माफियांचे धाबे दणाणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news