Illegal Sand Mining : पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; दोघांवर गुन्हे, ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

​गोदावरी पात्रातून हायवा, इंजिनसह बोट घेतली ताब्यात
Illegal Sand Mining
पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; दोघांवर गुन्हे, ७२ लाखांचा मुद्देमाल जप्तpudhari photo
Published on
Updated on

नांदेड: जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गोदावरी नदीपात्रासह परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी ७२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच आरोपींविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. २७ जून रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा (क्र. MH-28-R-7800) पकडला. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने पंचांसमक्ष हायवा जप्त करण्यात आला.

Illegal Sand Mining
Illegal Sand Mining : दोन दिवसांत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त !

यानंतर पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातील गोवर्धनघाट भागात दुसरी मोठी कारवाई केली. तेथे अवैध वाळू उपसा करणारी बोट, इंजिन आणि तराफे जप्त करण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची धडक कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि बाबुराव चव्हाण, व्यंकट कुसमे, तसेच अंमलदार कानगुले, भिसे, जमीर आणि सिरमलवार यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे नांदेडमधील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Illegal Sand Mining
Nanded Crime : एकाच दिवशी 62 गुन्हे दाखल; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

​या आरोपींवर गुन्हा दाखल

​पोलिसांनी समाधान बाबासाहेब जाधव (रा. गोवर्धनघाट, नांदेड), आदिनाथ मोरे, तुकाराम मोरे (दोघे रा. भनगी) आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार गुन्हे (गु.र.नं. ७८३/२०२६ आणि ७८४/२०२६) दाखल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news