Crime News : शहागंजमध्ये दोन गटांत 'राडा'; सुरी, रॉड अन दांड्याने हाणामारी

शहागंज परिसरातील निजामुद्दीन रोड भागात घर खाली करणे आणि वीज जोडणीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.
Crime News
Crime News : शहागंजमध्ये दोन गटांत 'राडा'; सुरी, रॉड अन दांड्याने हाणामारीfile photo
Published on: 
Updated on: 

Clash between two groups in Shahaganj; fighting involves knives, rods, and sticks

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहागंज परिसरातील निजामुद्दीन रोड भागात घर खाली करणे आणि वीज जोडणीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या वादात प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी धार्मिक स्थळाजवळ लघुशंका केल्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला. तसेच व्हिडिओची धमकी देत २ लाखांची खंडणी मागून सुरी, रॉड व टेस्टरने एकमेकांवर हल्ले चढवण्यात आले. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींसह एकूण तीन गुन्हे दाखल केले आहेत.

Crime News
Investment Fraud : फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या जाहिरातीला भुलले

उपनिरीक्षक संतोष खरात यांच्या फिर्यादीनुसार, अझमत अली याने लघुशंका केल्याचा व्हिडिओ मोहम्मद उमेर याने काढला होता. घर खाली न केल्याने उमेरने हा व्हिडिओ शांतता भंग करण्याच्या हेतूने व्हायरल केल्याने दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.

Crime News
Sambhajinagar News : शहागंजमध्ये प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला भीषण आग

तर डॉ. मोहम्मद अदनान अली याच्या तक्रारीवरून २ लाखांची खंडणी मागून रॉड-सुरीने हल्ला केल्याप्रकरणी उमेरसह ६ जणांवर, आणि वीज जोडणीवरून झालेल्या वादात टेस्टरने हल्ला केल्याप्रकरणी उमेरच्या तक्रारीवरून अझमतसह ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, हा वाद धार्मिक नसून घरमालक व भाडेकरू यांच्यातील आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.