पाटोद्यात पाणी असूनही नागरिकांची भटकंती

तळ्यात पाणी, नळाला कोरड; नगरपंचायतीच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा
Water Shortage
पाटोद्यात पाणी असूनही नागरिकांची भटकंतीPudhari
Published on
Updated on

Citizens wander despite water in Patoda

पाटोदा, पढारी वृत्तसेवा आष्टी-पाटोदा विधानसभा मतदारसंघातील पाटोदा शहर आज विचित्र विरोधाभास अनुभवत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना, नागरिकांना मात्र १५ दिवसांतून केवळ एकदाच पाणीप-रवठा केला जात आहे. पाणी असतानाही तहानलेले शहर, अशी विदारक अवस्था निर्माण झाली असून नगरपंचायतीच्या नियोजनशून्य, बेफिकीर आणि गलथान कारभारामुळे पाटोदाकरांना अक्षरशः 'वनवण' करावी लागत आहे.

Water Shortage
मंठा पोलिसांनी चोवीस तासांत लावला खुनाचा छडा

या गंभीर प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, सामाजिक कार्यकयां निलाताई पोकळे यांनी नगरपंचायतीविरोधात थेट आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पाटोदा शहराची तहान भागवणारा तलाव सध्या भरलेला आहे. तरीही नगरपंचायतीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक वाँडाँत पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही, परिणामी महिला, वृद्ध नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. टैंकरराज फोफावला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री नगरपंचायतीच्या निष्क्रियतेचा फायदा घेत खाजगी टैंकरधारकांचे फावत चाललेले 'टैंकरराज' नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना महागडे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असून, याचा थेट आर्थिक भार सर्वसामान्य कुटुंबांवर पडत आहे.

Water Shortage
कन्नड : तरुण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवर पाण्याची अतिरिक्त झळ बसत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर संतप्त प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या निलाताई पोकळे यांनी नगरपंचायतीच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, हे केवळ नगरपंचायतीचे अपयश नाही, तर नागरिकांवर लादलेली उघड अन्यायकारक जबरदस्ती आहे. तलावात पाणी भरलेले असताना नागरिकांची अशी अडवणूक का केली जाते? हा प्रश्न प्रशासनाने तात्काळ उत्- ारावा. नियमित आणि सुरळीत पाणीप रवठा तातडीने सुरू न झाल्यास नगरपंचायतीच्या दारात तीव्र आंदोलन छेडले जाईल.

'तळ्यात पाणी, पण नळाला कोरड'

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. तळ्यात पाणी, पण नळाला कोरड ही म्हण पाटोद्यात प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा दिला आहे. मुबलक पाणी असतानाही निर्माण झालेली ही कृत्रिम पाणीटंचाई नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आता प्रशासन वेळेत सुधारणा करणार की नागरिकांच्या रोषाला सामोरे जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news