मंठा पोलिसांनी चोवीस तासांत लावला खुनाचा छडा

पेवा ग्रा.पं. पाणीपुरवठा विहिरीत सापडले होते प्रेत
Sambhajinagar Crime News
मंठा पोलिसांनी चोवीस तासांत लावला खुनाचा छडाPudhari Photo
Published on
Updated on

Mantha police solved the murder case within twenty-four hours

मंठा, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील पेवा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीमध्ये एका अन-ोळखी २० ते २५ वर्षीय पुरुषाचे प्रेत पाण्यात तरंगतांना आढळुन आले होते. या खून प्रकरणात मंठा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत अटक करीत खुनाचा छडा लावण्यात यश मिळवले.

Sambhajinagar Crime News
Vaijapur News : शंभरांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

तालुक्यातील पेवा ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक विहीरीत २० ते २५ वर्षीय अनोळखी युवकाचे प्रेत तरंगत असल्याची माहीती मंठा पोलिसांना शुक्रवार (५) रोजी मिळाली होती. मंठा पोलीसांनी घटनास्थळी भेट देउन प्रेत नागरीकांच्या मदतीने विहीरीबाहेर काढले. यावेळी मयताने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातल्याचे निदर्शनास आले.

मयतास दोरीच्या साह्याने हातपाय बांधुन त्याच्या पोटाजवळ दगड बाधल्याचेही दिसुन आल्याने सदर मयताचा अज्ञात व्यक्तीने खुन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी पेवा येथील पोलीस पाटील यांच्या फिर्यादवरून मंठा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Sambhajinagar Crime News
निर्धारित वेळ संपल्यानंतर मतदारांना टोकन देऊन मतदानाची संधी

पोलिसांच्या तपासात मयताचे नाव अथर्व गणेश लोखंडे (२०) (रा.मरकळ ता. खेड जि. पुणे) असे असल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी किसन उर्फ कृष्णा राजाराम धोजे (रा.आडगाव तांडा ता. जिंतुर जि. परभणी ह.मु. काळजेवाडी चाहोरली खुर्द ता. हवेली जि. पुणे) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून यातील मयतास दहा लाख रूपये देण्याचा बहाणा सांगुन त्याचे कडील कारने मयतास मंठा तालुक्यातील पेवा शिवारात आणुन त्याने व त्याचे इतर दोन सहकारी नातेवाईकांनी कारमधुन अथर्व गणेश लोखंडे याचा दोरीच्या साह्याने गळा आवळुन खुन करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेवा शिवारातील विहीरीमध्ये टाकुन दिल्याची कबुली दिली.

आरोपीला कर्नाटकातून घेतले ताब्यात

सदर प्रकरणातील एका आरोपीस कर्नाटक राज्यातून मंठा पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा तपास फौजदार संतोष माळगे व पोलिस अंमलदार संतोष बनकर हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news