सीआयडी अधीक्षकांच्या गाडीची काच फोडली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक रिक्षा त्यांच्या शासकीय वाहनाला धडकल्याने पलटी झाली.
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

CID Superintendent's car window broken

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), नाशिक परिक्षेत्राचे अधीक्षक दीपक गिहे हे शासकीय कामानिमित्त वेगमपुरा भागात आले होते. अर्ध्या तासात काम आटोपून परत जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक रिक्षा त्यांच्या शासकीय वाहनाला धडकल्याने पलटी झाली. त्यात रिक्षातील महिला जखमी झाल्याने तिथे मोठा जमाव जमला. जमावातील एका महिलेने वाहनावर दगडफेक करून काच फोडली. ही घटना रविवारी (दि.८) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. रिक्षावाल्याने अधीक्षकांच्या वाहन चालकाला शिवीगाळही केली.

Accident
Sambhajinagar ZP Result 2026: छत्रपती संभाजीनगमध्ये भाजपची सरशी, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

नाशिक येथील सीआयडी विभागात कार्यरत असलेले चालक भरत काशिनाथ पवार (५२) यांच्या तक्रारीनुसार, ते रविवारी नाशिक परिक्षेत्राचे सीआयडीचे अधीक्षक दीपक गि-हे यांना सरकारी वाहनाने शासकीय कामानिमित्त घेऊन दुपारी ३ वाजता शहरात आले होते. शासकीय काम संपल्यानंतर बेगमनपुरा येथून अधीक्षकांना घेऊन अर्ध्या तासात ते परत नाशिकला जाण्यासाठी निघाले. दुपारी ३:३० वाजता शासकीय वाहन (एमएच-१२-पीटी-६९८०) विद्यापीठ गेटसमोरून जात असताना एका रिक्षा चालकाने (एमएच-२०-ईएफ-४१५४) सीआयडीच्या जीपला डाव्या बाजूने जोराची धडक दिली. त्यात रिक्षा पलटी झाल्याने त्यातील प्रवासी महिला जखमी झाली.

तिला नागरिकांनी धाव घेत घाटीत नेले. मात्र अपघातानंतर तिथे मोठा जमाव जमला होता. त्यातील एका महिलेने सरकारी वाहनावर दगडफेक करत काच फोडली. रिक्षा चालकही शिवीगाळ करून पळून गेला. वेगमपुरा पोलिसांनी रिक्षा जप्त केली असून, चालकाचा व त्या महिलेचा शोध सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास महिला अंमलदार पातोडे करत आहेत.

Accident
Crime News : पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या नराधम पतीला जन्मठेप

सीआयडीच्या वाहनाला दिवा असतो. पोलिसांचे वाहन आहे हे माहिती असताना जमाव एवढा आक्रमक का झाला? सीआयडीचे अधीक्षक दीपक गि-हे हे स्वतः वाहनात बसलेले होते. तरीही जमावातील महिलेने दगडफेक करत वाहनाची तोडफोड केल्याने याचे कोडे उलगडू शकलेले नाही. दरम्यान. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले.

नाशिक येथे सध्या कार्यरत असलेले सीआयडीचे अधीक्षक दीपक गिन्हे हे यापूर्वी शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे बेगमपुरा भागातच त्यांच्या खासगी वाहनाचा विद्यापीठात अपघात घडला होता. त्यानंतर पुन्हा बेगमपुरा भागातच ते आले असता आता शासकीय वाहनाचा अपघात झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news