Bombay High Court: दुसऱ्या लग्नातील अपत्यालाही वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

महत्त्वाचा न्यायनिवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. पी. ब्रह्मे यांनी दिला.
Court
CourtPudhari
Published on
Updated on

Bombay High Court chhatrapati sambhajinagar Bench on Children from second marriage Right on father's property

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुसऱ्या लग्नापासून झालेल्या अपत्यास वडिलांच्या मालमत्तेमध्ये वाटणीचा अधिकार असल्याबाबतचा महत्त्वाचा न्यायनिवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. पी. ब्रह्मे यांनी दिला.

Court
Sambhajinagar Municipal Corporation : परवानगीसह बांधकाम केल्यास मनपाकडून मिळू शकतो मोबदला

वर्षा (नाव बदलेले) ने तिच्या सावत्र आईविरोधात उदगीर दिवाणी न्यायालयात वाटणीचा दावा दाखल केला. सदर दाव्यात मृत वडिलांच्या मिळकतीत हिस्सा मागितला होता. उदगीर न्यायालयाने सदर दावा मंजूर करत मुलीला हिस्सा दिला. जिल्हा न्यायालयाने यावरील अपील खारीज केले. सदर नाराजीने, सावत्र आईने उच्च न्यायलयात दुसरे अपील दाखल केले.

सावत्र आईने, वर्षा ही दुसऱ्या लग्नातील अपत्य असल्यामुळे तिला वाटणीचा दावा दाखल करता येणार नाही, हिस्सा मिळणार नाही, या आशयाचा युक्तिवाद उच्च न्यायालयात मांडला.

Court
Sambhajinagar News : अनुदान घोटाळ्यातील बोगस लाभार्थी रडारवर

सुनावणीअंती खंडपीठाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रेवनसिदपा विरुद्ध मल्लिकार्जुन या निवड्याचा दाखला दिला. अवैध लग्नापासून झालेल्या अपत्यास सर्वोच्च न्यायालयाने तसेच हिंदू विवाह कायदा, १९५५ कलम १६ (१) अन्वये अवैध लग्नापासून झालेल्या अपत्यास वैधानिक वैधता कायद्याने गृहीतकाद्वारे दिलेली आहे. प्रतिवादी मुलीस दिलासा देत तालुका कोर्टाचा निकाल कायम करत दुसरे अपील खारीज केले आहे. सदर प्रकरणी प्रतिवादी मुलीतर्फे अॅड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले त्यांना अॅड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news