छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगरात चाकूने भोसकून तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगरात चाकूने भोसकून तरुणाचा खून
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा पुंडलिकनगर पुंडलिकनगर मध्ये ठाण्याच्या हद्दीत चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. आपापसातील वादातून ही घटना झाल्‍याचे समोर आले आहे. गणेश मारुती राऊत, असे तरुणाचे नाव असल्याचे समजते.

तीन दिवसांतील चाकू हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. रविवारी रात्री पुंडलिकनगर रोडवरील भाजीमंडीत सचिन माने या तरुणाला चाकूने भोसकले होते. या घटनेतील पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही घटना ताजी असतानाच आता गुरुदत्त नगरमधील गणेश राऊत या तरुणाचा भोसकून खून केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news