Adhir Writes letter To President : ‘माहिती आयुक्त निवडीवेळी मला अंधारात ठेवले’ : अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी | पुढारी

Adhir Writes letter To President : 'माहिती आयुक्त निवडीवेळी मला अंधारात ठेवले' : अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी

पुढारी ऑनलाईन डेस्क: माहिती अधिकार कायदा 2005 नुसार,केंद्रीय माहिती आयुक्तपदी हीरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या समितीचा सदस्य असताना देखील ‘ या नियुक्‍तीवेळी मला अंधारात ठेवण्यात आले’, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. यासंदर्भात तक्रारीचे पत्र त्‍यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिले आहे. (Adhir Writes letter To President )

केंद्रीय माहिती आयुक्तांची निवड ही एका केंद्रीय समितीच्या माध्यमातून होते. या समितीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या केंद्रीय मंत्री यांचा समावेश असतो. त्यानंतर पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीनंतर आणि त्यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींद्वारे ही नियुक्ती करण्यात येते. दरम्यान, केंद्रीय माहिती नवनियुक्त आयुक्त हिरालाल समरिया यांच्या निवड प्रक्रियेत अधीर रंजन चौधरी यांना पूर्णपणे अंधारत ठेवत ही प्रक्रिया राबवल्या असल्याचे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली.
( Adhir Writes letter To President )

लोकसभा विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता या नात्याने निवड समितीचा सदस्य आहे. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्‍या निवासस्थानी केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवडीबाबतची बैठक पार पडली. या बैठकीत CIC/ICs च्या निवडीबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते, असा आरोप रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना लिहलेल्या पत्रात केला आहे. ( Adhir Writes letter To President )

हेही वाचा:

Back to top button