

छत्रपती संभाजीनगर: केंद्र सरकारने सप्टेंबरपासून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध घातले आहे. त्याबाबत आदेश जारी होताच मंगळवारी (दि. २५) दिवसभर जिल्हा पुरवठा विभागाने साठेबाजांविरोधात धाडसत्र सुरू ठेवले. वात जिल्ह्यातील ९ तहसील अंतर्गत २६ दुकान व मॉल्स, कंपनीची झाडाझडती घेण्यात आली. त्यात २१२५ क्विंटल साठा अढळला. यात गंगापूरमधील कोका-कोला कंपनीत सर्वाधिक ८०० क्चिटल तर, पैठणरोडवरील वॉलमार्टमध्ये ४०० आणि वैजापूरच्या बालाजी ट्रेडर्सकडे २०० क्विंटल अढळून आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात १२ ऑगस्ट रोजी अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ (१९५५ चा १०) च्या कलम ३ च्या उप कलम ३ च्या उप कलम (१) नुसार साखर साठेबाजीबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबत सर्व राज्यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर सोमवारी राज्य पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिले. परंतु, मंगळवारी पुन्हा शासनाने साखर साठेबाजीबाबत व्हिडीओ कॉन्कन्सिंगद्वारे जिल्ह्यांची बैठक चैताली. त्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशात काही बदल करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार आता १० ऐवजी ४०० मेट्रिक टनपर्यंत साखरेचा साठा होलसेल विक्रेत्यासह मॉल्स आणि अन्न प्रक्रिया प्रकल्पांना ठेवता येणार आहे. शासनाध्या - आदेशानंतर सोमवारी जिल्हा पुरवठा विभागाने शहरातील डी मार्टमध्ये धाड़ माख्न तेथील साखर सातद्वाची माहिती घेतली.
दरम्यान, जिल्ह्यातील ९ तहसील कार्यालयांना प्रत्येकी एक पाक तयार वारून त्या त्या ठिकाणच्या होलसेलर आणि बड्या व्यापा-यांच्या गोडाऊनची तपासणी करून साखरेच्या सातधाची न माहिती घेण्याचे आदेश दिले होते. न त्यानुसार मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात पुरवठा विभागाध्या दुकानांसह मॉल्स आणि कंपन्यांवर धाडसत्र सुरू राहिले. यात संभाजीनगर शहरात २ मॉल आणि एक मोठ्या व्यापाऱ्याचे दुकान असे ३ ठिकाणी धाड टाकण्यात आली. तर संभाजीनगर ग्रामीण तहसीलकडून २, गंगापूरमध्ये एक कंपनीसह एक दुकान अशा २ ठिकाणी धाड टाकण्यात आली. तर कब्रडमध्ये ३, वैजापूरमध्ये ४. फुलंब्रीत २, सिल्लोड २, सोयगाव ३ आणि खुलताबाद ५ अशा त्यात २१९५ क्विंटल साखर साठा आढळला, ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.
या दुकान, मॉल्सची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (शहर)- ही मार्ट ९५.५ विवंटन, वॉलमार्ट ४७२ विवंटल, महावीर शॉपी ३८.५० क्विंटल, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) - मिलन स्वीट्स २४ क्विंटल, कालबार्स बीयर ३० क्विंटल
गंगापूर- कोकाकोला ८०० विचेटल, लाहोटी सुपर मार्केट ६०
कन्नड नमोकार सुपर मार्केट २० विचेटल, मंगलमूर्ती सुपर मार्केट ३० क्विंटल, आदर्श प्रोव्हिजन २५ क्विंटल
वैजापूर - बालाली ट्रेडर्स २०० क्विंटल, अतुल ट्रेडर्स ३७ग्विंटल, विशाल किराणा ८० क्विंटल, सिद्धोलकार १५०
क्विंटल फुलंब्री - साई मार्ट ३० क्विंटल, उत्तम मार्ट ५ क्विंटल ,सिल्लोड एफके मॉल ५० क्विंटल, निकम २.५ क्विंटल सोयगाव श्रीराम किराणा स्टोअर्स ५ क्विंटल, श्रीकृष्ण किराणा स्टोअर्स १० क्विंटल, श्रीराम सुपर मार्केट ४.५ क्विंटल खुलताबाद मुसा किराणा ३.५ क्विंटल, बीएम मार्ट ६.५ क्विंटल, डीजम मार्ट ५.५ सिरोटल, फुलारी ट्रेडर्स ११.५ क्विंटल, जलाली किराणा १ क्विंटल
आता ४०० मेट्रिक टनची सूट
केंद्र व राज्य शासनाने साखर साठेबाजीबाबत जो पहिला आदेश जारी केला होता. त्यात १० मेट्रीक टन म्हणजेच १०० क्विंटलपेक्षा जास्त साखर साठा होलसेल विक्रेत्यांसोबतच अन्न प्रक्रिया उद्योग, शितपेय कंपन्या, मॉल्स ठेऊ नये, असे होते. मात्र, मंगळवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फॉन्सिंगमध्ये शासनाने १ नाव्हेंबरपर्यंत ही मर्याद ४०० मेट्रिक टन म्हणजेच ४ हजार क्विन्टल पर्यंत वाढवली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.