Tipu Sultan Photo | मालेगाव उपमहापौरांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फोटो झळकला

Tipu Sultan Photo | 'टिपू सुलतानचा फोटो लावणे हा माझा अधिकार'; मालेगावचे उपमहापौर शान-ए-हिंद यांचा दावा.
Malegaon Municipality Election / मालेगाव महापालिका
Malegaon Municipality Election / मालेगाव महापालिकाPudhari News Network
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात आल्याने नव्या विवादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्यानंतर हिंदू संघटनांनी आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर हा फोटो काढण्यात आला होता.

Malegaon Municipality Election / मालेगाव महापालिका
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

उपमहापौरपदाची धुरा स्वीकारल्यानंतर शान-ए-हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. या प्रकारावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेत फोटो हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित फोटो कार्यालयातून काढण्यात आला.

मात्र, आता नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तोच फोटो पुन्हा लावण्यात आला आहे. फोटो काढण्यामागे कोणताही राजकीय किंवा वादाचा मुद्दा नसून कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने तो तात्पुरता काढण्यात आला होता, असा खुलासा उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला.

Malegaon Municipality Election / मालेगाव महापालिका
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज; 30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन पूर्ण

नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे त्यावेळीच स्पष्ट केले होते, असेही त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावणे हा आपला अधिकार असल्याचे सांगितले. इंग्रजांविरोधातील लढ्यात टिपू सुलतान यांचा सहभाग होता, असा दावाही त्यांनी केला.

'दहीहंडीच्या ऑलिम्पिकमधील समावशासाठी प्रयत्न'

महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईची खास ओळख असलेल्या 'दहीहंडी'ला राज्य सरकारने यापूर्वीच साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. येत्या काळात दहीहंडीचा आशियाड, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये समावेश करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. वरळी डोम येथे आयोजित 'प्रो-गोविंदा' लीगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news