Chhatrapati Sambhajinagar Crime : व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून विद्यार्थ्यावर कटरने जीवघेणा हल्ला

एमआयटी कॉलेज परिसरातील घटना; मैदानात बोलावून केले सपासप वार; सातारा पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर: कॉलेजच्या मुला-मुलींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कटरने सपासप वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील एमआयटी कॉलेजच्या मोकळ्या मैदानात घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात हल्लेखोर विद्यार्थ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवम स्वामी (मूळ रा. लातूर, सध्या रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे.जखमी फिर्यादी जिशांक जगदीश पाटील (२०, मूळ रा. मिलिंद नगर, वर्धा, सध्या रा. दिशा नगरी, बीड बायपास) याच्या तक्रारीनुसार, तो एमआयटी कॉलेजमध्ये बी.टेक. इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

Crime News
Manoj Jarange Patil : आंदोलन मोडीत काढून एकटे पाडण्याचा डाव

कॉलेजमधील मुला-मुलींनी मिळून एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी शिवम स्वामी याने या ग्रुपमधील मुलींना फोटो टाकण्याच्या कारणावरून वाईट बोलून गैरवर्तन केले होते. या कारणामुळे जिशांकने त्याला व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकले होते.

मंगळवारी (दि. २९) सायंकाळी साडेसात वाजता शिवमने जिशांकला फोन करून मला ग्रुपमधून का काढले? असा जाब विचारला असता, मला तुझ्याशी बोलायचे नाही असे सांगून जिशांकने फोन ठेवून दिला.

Crime News
Nanded Crime : 'एनओसी'साठी लाच मागणाऱ्या लिपिकासह खासगी अभियंत्यावर 'एसीबी'ची कारवाई

तुला जिवंत सोडणार नाही म्‍हणत केले कटरने वार

बुधवारी (दि. ३०) दुपारी साडेतीन वाजता शिवमने जिशांकला फोन करून एमआयटी कॉलेजच्या गेट नंबर ५ जवळ भेटण्यासाठी बोलावले. जिशांक तिथे गेल्यानंतर शिवम त्याला कॉलेजच्या मोकळ्या मैदानात घेऊन गेला. तू माझ्यासोबत असे का करतोस? असे विचारत शिवमने जिशांकला शिवीगाळ करत मारहाण केली. तुला मी जिवंत सोडणार नाही, म्हणत पँटच्या खिशातून कटर काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने जिशांकच्या डाव्या पायाच्या मांडीवर, उजव्या गुडघ्यावर आणि मानेच्या डाव्या बाजूला सपासप वार करून गंभीर जखमी केले.

मित्रांनी रुग्‍णालयात केले दाखल

कटरच्या हल्ल्यामुळे जिशांक रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी त्याची मैत्रीण आणि एका मित्राने तातडीने रिक्षातून बीड बायपास येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून टाके घातले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news