Nanded Crime : 'एनओसी'साठी लाच मागणाऱ्या लिपिकासह खासगी अभियंत्यावर 'एसीबी'ची कारवाई

​१ लाख २० हजारांची लाच स्वीकारताना खासगी इसम रंगेहाथ पकडला; भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded Crime
Nanded Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड : पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवून देणे आणि कागदपत्रांत वारंवार त्रुटी न काढण्याच्या मोबदल्यात अडीच लाख रुपयांची लाच मागून त्यातील १ लाख २० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी सायंकाळी धडक कारवाई केली. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ लिपीक सुकेश भीमराव नहारे आणि पारवे कन्स्ट्रक्शनचा खाजगी अभियंता सतीश मधुकर वाघोळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्यांच्या पेट्रोल पंपाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालय, नांदेड येथे NOC साठी अर्ज केला होता. मात्र, कार्यालयाकडून कागदपत्रांत वेळोवेळी त्रुटी काढल्या जात होत्या. ७ ऑगस्ट रोजी तक्रारदार कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेले असता, तेथे त्यांची भेट सतीश वाघोळे याच्याशी झाली. वाघोळे याने "काम लवकर पूर्ण करून हवे असेल तर कनिष्ठ लिपीक सुकेश नहारे यांना २,५०,००० रुपये द्यावे लागतील," अशी लाचेची मागणी केली.

Nanded Crime
CPWD Engineer Bribe Case: एनओसीसाठी तब्बल ७० लाखांची लाच! सीबीआयच्या सापळ्यात सीपीडब्ल्यूडी अभियंत्यासह पाच जण

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडे तक्रार नोंदवली. एसीबीने ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपी सतीश याने फोनवरून कनिष्ठ लिपीक सुकेश नहारे यांच्याशी संभाषण घडवून आणले. त्यानंतर प्रत्यक्ष भेटीत नहारे यांनी लाच मागणीला सहमती दर्शवली.

या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एसीबी नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Nanded Crime
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

सार्वजनिक बांधकाम मंडळाच्‍या आवारात कारवाई

गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) सायंकाळी ५.१७ वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. दरम्यान, खाजगी इसम सतीश वाघोळे याने तक्रारदाराकडून १,२०,००० रुपयांची लाच स्वतः स्वीकारली. त्याच वेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news