Ghrishneshwar Temple Verul : श्रावण सोमवारनिमित्त वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

दूरवरून पायी चालत आलेल्या भाविकांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे
Verul Temple Darshan
Verul Temple Darshan Pudhari
Published on
Updated on

वेरूळ : श्रावण महिन्यातील चौथ्या श्रावण सोमवारी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ वाढली असून, भगवान घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी दूरवरून आलेले भाविक तसेच पायी चालत आलेले भाविक दर्शनाच्या रांगेत शिस्तबद्धपणे उभे राहून भक्तिभावाने दर्शन घेत आहेत.

Verul Temple Darshan
Ghrishneshwar Jyotirlinga Temple : घृष्णेश्वर विकास आराखड्यासाठी ५३ कोटींचा वाढीव निधी मिळणार

श्रावण सोमवारनिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत असून, ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. अनेक भाविकांनी भगवान घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.

Verul Temple Darshan
Shri Ghrishneshwar Mahadev Temple : 'बम बम बोले, हर हर महादेवा'चा शिवभक्तांचा जयघोष

दूरवरून पायी चालत आलेल्या भाविकांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. दर्शनासाठी वाढलेली गर्दी पाहता श्रावण सोमवारच्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news