

Additional funds of Rs 53 crore will be provided for the Ghrishneshwar development plan.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखड्यासाठी ५३ कोटी रुपयांच्या वाढीव निधीला गुरुव-ारी उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली. या निधीतून चौपदरी बायपाससह विविध विकासकामे केली जाणार आहेत. आता घृष्णेश्वर विकास आर-ाखडा २१० कोटींचा झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने काही वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा तयार केलेला होता. आतापर्यंत शासनाने १५६ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. मात्र या आराखड्यात आणखी काही कामे करण्यासाठी वाढीव निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गुरुव ारी मुंबई येथे उच्चाधिकार समितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्य सचिव राजेशकुमार, सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नियोजन अधिकारी भारत वायाळ हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले.
या बैठकीत वाढीव ५३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. आता एकूण २१० कोटींतून मंदिर परिसराचा विकास होणार आहे. निविदा आणि वर्कऑर्डरपर्यंची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बायपास रस्त्यासह उर्वरित कामांना येत्या काही दिवसांत गती मिळेल. १५६ कोटींच्या आराखड्यात ९१ कोटींची वाढीव मागणी प्रशासनाने केली होती. आधी मंजूर निधीतील कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांना गती दिल्याबद्दल मुख्य सचिव राजेश कुमार यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांचे विशेष कौतुक केले.
कोणती एजन्सी करणार कामे
घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामे विविध एजन्सींच्या माध्यमातून होणार आहेत. यामध्ये ११२ कोटींतून सार्वजनिक बांधकाम विभाग, ४३ कोटींतून बायपास रस्ता, पुरातत्व विभागाच्या हद्दीत १३ कोटींची कामे होतील. महावितरण, एमटीडीसी, विद्युत विभाग, जीवन प्राधिकरणांच्या कामांचा या आराखड्यात समावेश आहे.