Chhatrapati Sambhajinagar protest : संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाला घेराव

४६ हजार कोटींचा निधी वळविल्याचा आरोप, वंचितकडून निषेध
Chhatrapati Sambhajinagar protest
Chhatrapati Sambhajinagar protestpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती-जमातीच्या (एससी-एसटी) विकासासाठी राखीव असलेला ४६०१.१३ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी वळविल्याचा आरोप करीत बुधवारी (दि. १६) वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली एससी-एसटी समूहांनी सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढत बंगल्याला घेराव घातला. कमिशन चोर खुर्ची सोड म्हणत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी आंदोलनात प्रा. नागोराव पांचाळ, जितरत्न पटाईत, दीपक डोके, ज्ञानेश्वर कवठेकर, उत्तम वनशिवे, नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेविका करुणा जाधव, रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, पंकज बनसोडे, सतीश गायकवाड, जिल्हा महासचिव अंजन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Chhatrapati Sambhajinagar protest
Latur agriculture : आभाळ कोरडे... डोळे मात्र ओले! खरीप गेल्यात जमा

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात सहभागी सर्व आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पातोडे यांनी एससी-एसटीच्या विकासासाठी राखीव निधी इतर योजनेसाठी वळविल्याचा आरोप करत सरकारने या निधीबाबतची संपूर्ण माहिती जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र तरतूद असतानाही आदिवासी विकास विभागातील सुमारे एक हजार कोटी आणि समाजकल्याण विभागातील सुमारे ३५०० कोटी रुपये वळविण्यात आले आहेत, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. या निधीवळणाच्या निर्णयाविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मंत्री शिरसाट हे जाणूनबुजून योजनांचा निधी उपलब्ध करुन देत आहेत, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच संतप्त तरुणांनी कमिशन खोर खुर्ची सोडच्या घोषणा यावेळी दिल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून अडवणुकीचा प्रयत्न झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी शेकडोच्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून टाकला होता.

अन्यथा तीव्र आंदोलन

राज्य शासनाने एससी एसटीच्या विकासाचा निधी वळविण्याचा जो निर्णय घेतला. तो तातडीने रद्द करावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला.

Chhatrapati Sambhajinagar protest
Jalna farmers protest : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांचे उपोषण‌ !

मंत्री शिरसाट मुंबईत

या आंदोलनावेळी मंत्री संजय शिरसाट हे मुंबईत मंत्रीमंडळ बैठकीत होते, असे त्यांची मुलगी तथा शिवसेना नगरसेविका हर्षदा शिरसाट यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news