Chhatrapati Sambhajinagar Crime : ग्रामीण पोलिसांचा अवैध धंद्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक'

१२ तासांत १२९ आरोपींवर कारवाई; ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Chhatrapati Sambhajinagar Crime
कारवाई करणारे पोलिस पथक (इन्सेट) हातभट्टीच्या दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांकडून नष्ट करण्यात आले.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आगामी सण-उत्सर्वाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.२४) रात्रभर 'ऑपरेशन ऑल आऊट' अंतर्गत अवघ्या १२ तासांत तब्बल १२९ आरोपींवर कारवाई करत १०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ७५ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उत्सव काळात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळवला जातो. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या २८ जुगार अड्यांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. यात ५२ आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sambhajinagar chief fire officer vacancy : शहराची अग्निसुरक्षा दहावी पास निवृत्त अधिकाऱ्याच्या हाती

सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर जंगलातील दुर्गम भागात, नदी-नाल्यांच्या कडेला छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टयांवरही प्रहार केला. दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. याप्रकरणी ५५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी १ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करत देशी-विदेशी दारू, गावठी रसायन आणि दारू पाडण्याचे साहित्य जागेवरच नष्ट केले. तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २० आरोपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Sugar Raid : जिल्ह्यात २६ दुकानांसह गोडाऊनची झाडाझडती

दरम्यान, खुलताबाद शहरात जुन्या बसस्थानक परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून १३ घरगुती सिलिंडरसह १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करत केला.

अवैध धंदे खपवून घेणार नाही

आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. अशा वेळी जिल्ह्यात जुगाराचे अड्डे, अवैध दारू विक्री किंवा नशेचे आणि प्रतिबंधित पदार्थ खपवून घेतले जाणार नाहीत. तसेच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल. ऑपरेशन ऑल आऊट ही केवळ तात्पुरती मोहीम नसून, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ती सातत्याने राबवली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news