Sambhajinagar Crime : महिला पोलिसाला पतीसह सासरच्यांची मारहाण

पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एका महिला पोलिस कर्मचाऱ्यालाच तिच्या सासरच्यांकडून घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी पती हा आर्मीमध्ये जवान असून, त्याने पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या पुतण्याच्याही डोक्यात दांडक्याने मारून जखमी केले.

ही घटना बुधवारी (दि. २ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात पती अकील, सासू, नणंद आणि नंदोई रज्जाक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar crime : बुलेटच्या चावीवरून दोन गटांत हाणामारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ४५ वर्षीय महिला हेड कॉन्स्टेबल शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. त्या त्यांच्या मुलांसह शिवाजीनगर भागात राहतात. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांचा पती अकील हा सासू, नणंद आणि नंदोई यांच्यासोबत एका कारने त्यांच्या घरी आला. घरात येताच सासू आणि नणंदेने तुला कशाला बैठक बसवायची आहे, असे म्हणत फिर्यादी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

महिला त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतानाच, नणंदेने त्यांचे केस धरून त्यांना जमिनीवर पाडले, तर सासूने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी नंदोई रज्जाक यानेही शिवीगाळ करत फिर्यादीला मारहाण केली. घरात आरडाओरड आणि मारहाण सुरू असल्याचे ऐकून फिर्यादी महिलेच्या भावाचा मुलगा भांडण सोडवण्यासाठी धावून आला.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar prison : हसूल तुरुंगाच्या भिंतीआड फुलतेय 'शिक्षणाची बाग'

मात्र, अकील याने दांडक्याने त्याच्या डोक्यावर मध्यभागी मारून जखमी केले आणि त्याचा डावा हात मुरगळला. तू कशाला आमच्यामध्ये पडतो, आता तुम्हाला मी सोडणार नाही, माझ्या नादी लागलात तर तुझ्या सर्व घराला जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार तारव हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news