Local body election : एक मतदार करू शकेल चार उमेदवारांना मतदान

Chhatrapati Sambhajinagar : प्रभागात चाळीस हजार लोकांपर्यंत मतदार
Local body elections
एक मतदार करू शकेल चार उमेदवारांना मतदान(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Politics

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेची निवडणूक यावेळी प्रभाग पद्धतीने होणार आहे. प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना मतदान करता येणार आहे. तर दुसरीकडे आता सर्वच उमेदवारांना प्रभागातील चाळीस हजार लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मर्जी संपादित करावी लागणार असल्याने इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.

Local body elections
Local Body Elections | आली निवडणूक की, भर अर्ज!

महापालिकेची सन २०१५ ची निवडणूक ही वॉर्ड पद्धतीने झाली होती. त्यावेळी शहरात ११५ वॉर्ड होते. प्रत्येक वॉर्डातून एकेक सदस्य निवडून देण्यात आला. त्यावेळी वॉर्डाचा आकार हा सरा-सरी ८ ते १० हजार लोकसंख्येचा होता. त्यामुळे कमी क्षेत्रफळ आणि कमी लोकसंख्येत तयारी करून विजयी होणे तुलनेने सोपे होते. मात्र, यावेळची निवडणूक प्रभाग पदध्तीने होत असल्याने इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. यावेळी शहरात एकूण २९ प्रभाग आहेत. त्यातील शेवटच्या प्रभाग वगळता उर्वरित सर्व प्रभागातून प्रत्येकी चार सदस्य निवडून दिले जाणार आहे. पूर्वीच्या वॉडांच्या तुलनेत प्रभागांचा आकार आणि लोकसंख्या चारपट अधिक आहे. एका प्रभागात सरासरी ४० ते ४५ हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर तयारी करावी

मिनी आमदारकीच..

महापालिकेत निवडून जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांना संपूर्ण प्रभागात प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे. एका प्रभागात सरा-सरी ४० ते ४५ हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचार यंत्रणा आणि खर्चाच्या बाबतीत ही निवडणूक मिनी विधानसभाच ठरणार आहे.

आता वॉर्ड विसरा..

महापालिकेच्या आरक्षण सोडतीवेळी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी इच्छुकांना उद्देशून आता वॉर्ड विसरा असे आवाहन केले. वॉर्ड पद्धत बंद झाली आहे. आता प्रभाग असेल. त्यातून चार सदस्य निवडून येतील. प्रभागात कोणतीही वर्गवारी असणार नाही. सर्व चारही सदस्यांसाठी प्रभाग हाच त्यांचा मतदारसंघ असेल. प्रत्येक जण संपूर्ण प्रभागाचा नगरसेवक असेल, असेही श्रीकांत यांनी सांगितले. लागणार असल्याने त्यांचे टेन्शन वाढले आहे. यावेळी मतदारांना आपल्या प्रभागातून प्रत्येकी चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदान नोंदविता येणार आहेत.

Local body elections
Raigad local body elections : पालिका निवडणुंकासाठी भाजपने कंबर कसली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news