

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीमुळे अनेकांना रोजगा मिळाला आहे. कामगार चौकात उभे राहणारे प्रत्येक जण यामुळे दिवसाला किमान १ ते दीड हजार रुपये घरी नेत आहेत. शहराच्या बहुतांश प्रभागांमध्ये सध्या विविध उमेदवारांच्या मागे पक्षाचे कमी आणि हे भाडोत्री कार्यकर्त्यांचीच अधिक संख्या दिसत आहे.
निवडणुकीत सर्वाधिक बेर-ोजगारांना रोजगार उपलब्ध होत असतो. यंदाही महापालिकेच्या निवडणुकीत शेकडो जणांना प्रचाराचा रोजगार मिळाला आहे. यात काहींनी उमेदवारांच्या विविध प्रकारे प्रचाराचे काम घेतले आहेत. त्यासोबतच आता प्रचार रॅली, प्रचार सभा, कॉर्नर बैठका यात स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीन हजेरी लावावी यासाठी उमेदवार आपल्या रॅली, सभा आणि बैठकांमध्ये स्वतःच्या कायकर्त्यांसोबतच भाडोत्री कार्यकर्तेही ठेवताना दिसत आहेत.
यात काही कार्यकर्ते हे सकाळी एका रॅलीत तर दुपारी दुसरयाच्या प्रचार सभेत आणि सायंकाळी तिसरयाच्या प्रचार रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. एकाच प्रभागामध्ये प्रमुख पक्षांचे सुमारे चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या सर्वांच्या प्रचाराचे काम या भाडोत्री कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असल्याचे चित्र सध्या प्रत्येक प्रभागामध्ये दिसत आहे. यात काही जण तर पहाटेच उमेदवारांच्या घरासमोर उभे राहात आहेत. तर काही जण उमेदवारांनी दिलेल्या जागेवर प्रतीक्षा करीत ठाण मांडून बसलेले दिसतात. दररोज हेच चित्र विविध प्रभागांमध्ये दिसत आहे.
कार्यकर्त्यांचे दर वाढले
गर्दी वाढविण्यासाठी अनेक जण भाडोत्री कार्यकर्ते आणतात. परंतु महापालिकेच्या निवडणुकीत हे भाडोत्री कार्यकर्तेही उमेदवारांना मिळणे अडचणीचे झाले आहे. अनेक उमेदवार रिंगणात असल्याने भाडोत्री कार्यकर्त्यांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनीही आपले दर प्रतिदिन ५०० ते ७०० रुपयांवरून १ हजार ते दीड हजार केले आहे. अनेक जण तर दिवसातून तीन रॅलींना हजेरी लावत आहेत. त्यामुळे सुमारे तीन ते चार हजार रुपये त्यांना मिळत आहे, असे एका भाडोत्री कार्यकत्यनि सांगितले.