Chatrapati Sambhajinagar : महापौर पदासाठी बुधवारपासून उमेदवारी अर्जाचे वितरण

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, शुक्रवारपर्यंत राहणार मुदत
Chhatrapati Sambhajinagar mayor election
महापौर पदासाठी बुधवारपासून उमेदवारी अर्जाचे वितरणFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या २३ व्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रकासह कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या बुधवारी आणि गुरुवारी (दि. ४, ५) सकाळी १० ते सायंकाळी ६ आणि शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाचे वितरण होणार आहे. तर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे, असे महापालिकेचे नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांनी जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत नमूद आहे. तसेच छाननी, उमेदवारी माघारी आणि इतर प्रक्रिया निवडणुकीच्या दिवशी १० फेब्रुवारीला सभागृहात होणार आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाला जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येकाचे लक्ष हे महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. भाजप सत्ता स्थापन करणार आहे. परंतु महापौरपदासाठी कोणाची निवड करेल, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्यात शिवसेना (उबाठा), कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुती करून एकत्रित गट स्थापन करणार की, वेगवेगळे राहणार याबाबतही अद्याप कोणतीच माहिती या पक्षांकडून देण्यात आलेली नाही.

Chhatrapati Sambhajinagar mayor election
Property seizure order court : अपघातातील मृत तरुणाच्या वारसांना पैसे देण्यास टाळाटाळ

वंचित बहुजन आघाडीचे चार उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे ते कोणाला साथ देणार हेही अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र असे असले तरी विभागीय आयुक्तालयाकडून मंगळवारी महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली. त्यासोबतच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, बुधवारी महापालिकेचे नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या बुधवारी आणि गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ आणि शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाचे वितरण होणार आहे. तर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आयोजित विशेष सभेला सुरूवात होणार आहे.

यात सभा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. त्यानंतर वैध अर्जातील उमेदवारांची नावे जाहीर केली जाईल. उमेदवारी माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाईल. मुदतीत माघार घेतल्यानंतर पुन्हा पात्र उमेदवारांच्या नावे जाहीर करून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे

हात उंचावूनच होणार मतदान

महापौर-उपमहापौर पदांसाठी सोमवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. यात सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मतदान प्रक्रिया ही हात उंचावूनच केली जाणार आहे. पहिल्यांदा महापौर पदासाठी, तर नंतर उपमहापौर पदासाठी मतदान होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar mayor election
Naigaon ration scam : नायगावात‌‘मुडदे‌’ही खातात रेशन!

गट नोंदणी ५ फेब्रुवारीनंतरच

महापालिकेतील सर्वाधिक जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर असलेला पक्ष भाजप आहे. त्यांचे ५७ नगरसेवक विजयी झाले आहेत. या पक्षाकडून येत्या ५ फेब्रुवारीनंतरच गटाची नोंदणी करण्यात येण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष एमआयएम असून, त्यांनी ३३ जागा जिंकल्या आहेत. तेही १ फेब्रुवारीनंतरच गट नोंदणी करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news