Chhatrapati Sambhajinagar lawyers protest : विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वकील रस्त्यावर

क्रांती चौकात जोरदार निदर्शने : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Chhatrapati Sambhajinagar lawyers protest
दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनात मोठ्याप्रमाणात सहभागी वकील. (छाया : बाळू देशमुख)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ खंडपीठ वकील संघ आणि जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२४) क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वकिलांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.

Chhatrapati Sambhajinagar lawyers protest
Sambhajinagar Paithan road : संभाजीनगर-पैठणसाठी होणार नवा समांतर रस्ता

त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखत लाठीहल्ला व अश्रुधुराचा वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असून, त्याचे पडसाद शुक्रवारी शहरातही उमटले. क्रांती चौकात दुपारी झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, हुकूमशाही चालणार नाही,संविधान वाचवा, देश वाचवा, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी क्रांती चौक परिसरातच अडविले. बॅरिकेड्स उभारून त्यांना आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होता आले नाही.

Chhatrapati Sambhajinagar lawyers protest
Chhatrapati Sambhajinagar robbery : रिक्षात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणावर चाकूहल्ला करून लुटले

बॅरिकेड्स लावून रोखले विद्यार्थ्यांना

विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ क्रांती चौकातील आंदोलनासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले. त्यामुळे वकील संघाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची इच्छा असूनही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होता आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news