Chhatrapati Sambhajinagar robbery : रिक्षात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणावर चाकूहल्ला करून लुटले

सिडको बसस्थानकाजवळ तिघांचा हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जेवणासाठी मध्यरात्री पायी चाललेल्या रिक्षावाल्याने आग्रहाने बसवून थोडे पुढे सोडले. रिक्षातून उतरताच मागून आलेल्या तिघांनी रिक्षाचे भाडे दे म्हणत चाकूने वार करून लुटले. ही घटना सोमवारी (दि.२०) रात्री १ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक परिसरातील बिर्याणी हाऊस हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शैलेश गणेशराव पायमोडे (३४, रा. भानुदासनगर, जवाहरनगर कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, ते २० जुलै रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक परिसरातील बिर्याणी हाऊस येथे जेवणासाठी पायी चालले होते. त्याचवेळी त्यांच्याजवळ एक रिक्षावाला आला आणि 'रिक्षात बस, मी तुला सोडून देतो,' असे म्हणाला.

Crime News
Sambhajinagar Child assault : चेलीपुऱ्यातील मदरशात ११ वर्षीय चिमुकल्याला मारहाण

शैलेश यांनी 'मला येथेच जवळ जायचे आहे, मी पायी जातो,' असे सांगितले. मात्र रिक्षावाल्याने आग्रहाने बसण्यास सांगितल्याने ते रिक्षात बसले आणि थोडे पुढे गेल्यावर उतरले. रिक्षातून उतरताच त्यांच्या मागून तीन लुटारू आले आणि त्यांनी रिक्षाचे भाडे मागितले. मला रिक्षावाल्याने पैसे मागितले नाहीत, तुम्ही कोण मागणार?' असे शैलेश म्हणाले.

तरीही वाद नको म्हणून त्यांनी खिशातून काढून ५० रुपये त्यांना दिले. मात्र पैसे मिळताच या तिघांनी शैलेश यांना खाली पाडून शिवीगाळ सुरू केली. एकाने चाकू काढून शैलेश यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. खिशातील पाकीट, त्यातील १७२० रुपये, मोबाईल आणि इअरबड्स असा १२ हजार ४२० रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले. पुढील हवालदार संजय नंद करत आहेत.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar News : वाहनांच्या बोगस फिटनेसला आता लगाम

रात्रभर रस्त्यावर नशेखोर, लुटारूंचा वावर

शहरात रात्री पोलिसांनी गस्त नेमकी कुठे सुरू असते, हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. सिडको चौक परिसरात लूटमार, चाकूहल्ल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. रस्त्यावर नशेखोर, लुटारूंचा मुक्त वावर असतो. मात्र तरीही पोलिसांना गस्तीत हे गुन्हेगार सापडत नाहीत हे विशेष. काही दिवसांपूर्वी लुटमारीतूनच आकाशवाणीजवळ खुनाची घटना घडली होती. दरम्यान, काही गुन्हेगार रिक्षाचा वापर करून गुन्हे करतात. तीन दिवसांपूर्वीच शहागंज येथून एका चिमुकलीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. यातील आरोपीही अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news