WhatsApp RTO APK Scam | आरटीओ चलान एपीके फाईल डाउनलोड करणे पडले महागात

WhatsApp RTO APK Scam |सायबर भामट्याने क्रेडिट कार्डवरून घेतला आयफोन
Mobile
Mobile
Published on
Updated on
Summary
  • शहरातील हॉटेल मालक रवी ढोरजे यांचा मोबाईल व्हॉट्सअॅपवर आलेल्या फेक RTO चलन APK फाईलमुळे हॅक झाला.

  • हॅकरने ओटीपी न विचारता ५८,२१७ रुपयांचा अॅपल आयफोन ऑनलाइन खरेदी केला.

  • हॅकरने कॉल डायव्हर्जन वापरून एसबीआय क्रेडिट कार्डचे अलर्ट स्वतःकडे वळवले.

  • या प्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त

शहरातील हॉटेल चालकाला व्हॉट्सअॅपवर आ-लेली आरटीओ चलन एपीके फाईल डाउनलोड करणे चांगलेच महागात पडले. फाईल उघडताच मोबाईल हॅक करून सायबर भामट्याने ओटीपी न विचारता त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ५८ हजार २१७किमतीचा आयफोन ऑनलाइन खरेदी करून गंडा घातला.

Mobile
Chhatrapati Sambhajinagar : दुबईतून तीन पट फंडिंगचे आमिष दाखवून 50 लाखांचा घातला गंडा

ही घटना २५ नोव्हेंबरला सूतगिरणी रोडवरील रुद्र फूडकोर्ट येथे घडली. रुद्र फूडकोर्ट हॉटेलचे मालक रवी ढोरजे (५२, रा. गजानन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, २५ नोव्हेंबरच्या रात्री ८:३० वाजेच्या सुमारास हॉटेलवर असताना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून आरटीओ चलनाच्या नावाने एक एपीके फाईल आली.

ती फाईल बघण्यासाठी त्यांनी उघडली. फाईल उघडताच त्यांचा मोबाईल सायबर भामट्याने हॅक केला. अवघ्या दहा मिनिटांनी फ्लिपकार्ट लॉग-इन झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर लगेचच त्यांच्या एसबीआय क्रेडिट कार्डमधून प्रथम १२० रुपये आणि पाठोपाठ ५८ हजार २१७ रुपये असे दोन व्यवहार झाल्याचे मेसेज आले.

Mobile
आ. बंब यांना धमकीची भाषा, गुन्हा दाखल करण्याची मागणी

विशेष म्हणजे, या दोन्ही व्यवहारांसाठी त्यांना कोणताही ओटीपी विचारला गेला नाही. क्रेडिट कार्ड कंपनीकडून येणारा ओटीपी किंवा व्यवहाराचा अलर्ट कॉल हॅकरने कॉल डायव्हर्जनद्वारे स्वतःकडे वळवून घेतला आणि ट्रान्झेंक्शन पूर्ण केले. तातडीने धोका लक्षात आल्यामुळे ढोरजे यांनी एसबीआय क्रेडिट कार्ड तत्काळ ब्लॉक केले आणि कस्टमर केअरला संपर्क साधून तक्रार नोंदवली.

दुसऱ्या दिवशी (२६ नोव्हेंबर) मोबाईल मफॅक्टरी रिसेटफकरून पाहणी केली असता, त्यांच्या कार्डमधून ५८,२१७किमतीचा अॅपल आयफोन १६ खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. हा आयफोन कोलकात्यातील एका पत्त्यावर डिलिव्हरीसाठी ऑर्डर करण्यात आला होता. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news