MSEDCL load shedding news | उष्णतेच्या लाटेचा महावितरणलाही फटका

वाढलेल्या मागणीमुळे वाहिन्या ओव्हरलोड, पन्नालालनगर उपकेंद्राचा वीजपुरवठा तासाभरात सुरळीत
load shedding news
load shedding news
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र अचानक वाढलेल्या विजेच्या मागणीचा भार महावितरणच्या वाहिन्यांनाही सोसवेना झाला आहे. गुरुवारी रात्री पन्नालालनगर उपकेंद्राकडे येणारे दोन्ही 33 केव्ही फीडर ओव्हरलोड होऊन बंद पडले. त्यामुळे जवळपास 15 ते 20 हजार नागरिकांचा वीजपुरवठा तासभर बंद राहिला. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला

load shedding news
Nanded electricity bill : 622 कोटी 80 लाखांची वीजबिले थकबाकी!

संध्याकाळच्या वेळी विजेची सर्वोच्च मागणी असते. गेल्या काही दिवसांत राज्यभर आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे विजेची मागणी प्रचंड वाढलेली आहे. शहरात गुरुवारी कमाल तापमान 41.4 अंश सेल्सियस होते. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी फॅन, कुलर, एसी ही विद्युत उपकरणे नागरिक वापरत आहेत.

load shedding news
Dharashiv News : महावितरणच्या दारात उभारली स्मार्ट मीटरची गुढी

महावितरणच्या 33 केव्ही पन्नालालनगर उपकेंद्रास महापारेषणच्या चिकलठाणा व सातारा येथील 132 केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र विजेच्या ढत्या मागणीचा भार न पेलल्यामुळे सातारा फीडर 7.15 च्या सुमारास बंद पडला. त्यामुळे या फीडरवरील भार चिकलठाणा फीडरवर वळवून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र हा फीडर ओव्हरलोड होऊन 8.52 वाजता बंद पडला. दोन्ही फीडर बंद पडल्यामुळे पन्नालालनगर उपकेंद्र काळोखात गेले.

load shedding news
Mahavitaran News : महावितरणकडून वीजबिल वसुली अधिक गतिमान; २४९७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

दरम्यान, महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधण्यासाठी तातडीने दोन्ही फीडरवर पेट्रोलिंग सुरू केले. रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात तंत्रज्ञांनी प्रत्येक खांब तपासला. तबरीच पायपीट केल्यावर चिकलठाणा फीडरवार हनुमाननगरमध्ये तर सातारा फीडरवर एमआयटी कॉलेजजवळ खांबावरील जंप तुटल्याचे निदर्शनास आले.

load shedding news
Akurdi Power Cut Issue: आकुर्डी, निगडी, चिंचवडमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

अथक परिश्रमानंतर चिकलठाणा फीडर रात्री 10.05 वाजता सुरू झाला. त्यामुळे पन्नालालनगर उपकेंद्रावरील सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. दहा मिनिटांच्या अंतराने सातारा फीडरही सुरू झाला. कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख व त्यांच्या 30 सहकाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news