

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात उष्णतेची लाट आली असून, मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचा इशारा 40 30 20 10 C हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सूर्य चांगलाच तळपला असून, शहराचा पारा ४० अंशांपार गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तापमानवाढीचा सर्वाधिक फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असून, छोट्या मोठ्या व्यवसायावरही उष्णतेचा परिणाम जाणवत आहे.
पारा ४० सेल्सिअस, तर किमान तापमान २४.४ अंश अंशांपार सेल्सिअस असल्याची नोंद चिकलठाणा शहरात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता विक्रमी पातळीवर पोहोचली असून, बुधवारी (दि.१५) कमाल तापमान ४०.८ अंश 30 शाळेत नोंदवल्या गेली. हवेतील आद्रता १४ टक्क्यांवर पोहोचली असून, उकाड्यात वाढ झाली आहे.
सकाळपासूनच वाढलेला उकाडा दुपारपर्यंत असह्य बनत असून, शहरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे. उष्णतेच्या या लाटेचा सर्वाधिक फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, अंगातील अशक्तपणा, तसेच शरीरातील पाण्याची कमतरता अशा तक्रारींमध्ये वाढ होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिवसभर उन्हात काम करणारे कामगार यांना उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
याचबरोबर, शहरातील आर्थिक व्यवहारांवरही उष्णतेचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. दुपारच्या वेळेत ग्राहकांची वर्दळ लक्षणीयरीत्या घटल्याने किरकोळ दुकानदार, भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. बांधकाम क्षेत्रातही कामकाजाचा वेग मंदावला आहे. कडक उन्हामुळे मजुरांना दीर्घकाळ काम करणे कठीण जात असून दुपारच्या सत्रात कामे थांबवावी लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे शहरातील जनजीवनाची गती काही प्रमाणात मंदावली असून आरोग्य आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत.