Chhatrapati Sambhajinagar: १३ ग्रामपंचायतींच्या लाखोंच्या घोटाळ्याची आकडेवारी ‘पुढारी’च्या हाती

Vaijapur Taluka Gram Panchayat scam latest news: “फक्त ऑपरेटरच दोषी कसा? सरपंच-ग्रामसेवकांवर गुन्हा कधी? संतप्त नागरिकांचा सवाल
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Vaijapur Taluka Gram Panchayat scam news

नितीन थोरात

वैजापूर: तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ३४ लाख १९ हजार ९१५ रुपयांचा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. आता त्यातच घोटाळ्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमधील आकडेवारी 'पुढारी'च्या हाती आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Khed Gram Panchayat Scam | खेड ग्रा. पं. मध्ये पावणेसतरा लाखांचा अपहार

१७ जुलै रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कृष्ण वेणीकर यांच्या बैठकीदरम्यान ग्रामपंचायतींकडून संगणक परिचालकांना देण्यात येणाऱ्या मानधनात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात तालुक्यातील एका ऑपरेटरने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी “जेवढा ऑपरेटर, तेवढेच ग्रामसेवक व सरपंच दोषी” असल्याचेही पुढारीला ठामपणे सांगितले. मात्र प्रत्यक्ष कारवाई फक्त एका ऑपरेटरवरच झाली आहे. या घोटाळ्यातील आठ ग्रामसेवक आणि तेरा सरपंचांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Chhatrapati Sambhajinagar
New Gram Panchayats : राज्यात 17 नवीन ग्रामपंचायतींना मंजुरी

आता मात्र १३ ग्रामपंचायतींमधील घोटाळ्याची ठोस आकडेवारी पुढारी समोर आल्यानंतर नागरिकांकडून प्रशासनावर टिकेचा भडीमार सुरू झाला आहे. “फक्त ऑपरेटरच दोषी कसा? सरपंच-ग्रामसेवकांवर गुन्हा कधी?” असा सवाल नागरिक सरळसरळ विचारत आहेत. प्रशासन विभागीय स्तरावर कारवाई होईल, अशी भूमिका घेत आहे. परंतु गुन्हा नोंदवण्याबाबत मात्र प्रशासन मौन बाळगत असल्याने संताप वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांच्या दबावामुळे खरोखरच सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल होतो का, याकडे तालुक्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Amalner, Gandhali Gram Panchayat : गांधली ग्रामपंचायतीची वाटचाल डिजिटलकडे

कोणत्या ग्रामपंचायतची किती रक्कम?

एकूण अपहाराची रक्कम : ३४,१९,९१५ इतकी असून, यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीची रक्कम खालीलप्रमाणे;

  • चोरवाघलगाव – ५,२४,८८८

  • मनेगाव – १,९१,२२२

  • आंचलगाव – ७४,८८१

  • सटाणा – ४०६,४४१

  • हाजीपूरवाडी – ४,८८,६९४

  • रघुनाथपुरवाडी – २,९४,०२४

  • वडजी – १,८३,७५४

  • अव्वलगाव – १,४१,०००

  • भग्गाव – १,५६,५८०

  • बेलगाव – २,१०,६१५

  • खरज – ३,८६,५०४

  • भिवगाव – २,१२,३४०

  • तलवाडा – १,४८,९७२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news