Amalner, Gandhali Gram Panchayat : गांधली ग्रामपंचायतीची वाटचाल डिजिटलकडे

कर वसुलीसाठी क्यूआर कोडची अंमलबजावणी
Amalner, Gandhali Gram Panchayat
Amalner, Gandhali Gram PanchayatPudhari News Network
Published on
Updated on

जळगाव (अमळनेर तालुका) – गांधली ग्रामपंचायतीने डिजिटल परिवर्तनाची दिशा पकडत कर वसुलीत नवे पाऊल टाकले आहे. पारंपरिक घर क्रमांकाऐवजी प्रत्येक घरावर क्यूआर कोड बसवून कर वसुलीची अत्याधुनिक पद्धत राबवण्यात आली आहे.

धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली राबवणारी गांधली ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या क्यूआर कोडद्वारे नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी ऑनलाइन भरण्याची सुविधा मिळेल. मालमत्तेची माहिती, चालू किंवा थकीत कर रक्कम, पावती डाउनलोड आणि डिजिटल पेमेंट अशा सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होतील. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक व सुसूत्र होणार आहे.

Amalner, Gandhali Gram Panchayat
Model Gram Panchayat | कलमठसारखी आदर्श ग्रामपंचायत बघितल्याचा मला मोठा आनंद

हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक प्रमोद पाटील, संगणक सहाय्यक मंगेश मांडे आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात आला. ग्रामस्थांनी या उपक्रमाला एकमुखी पाठिंबा दिला आहे, असे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी या डिजिटल उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले असून, हा हायटेक उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Nashik Latest News

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news