Chhatrapati Sambhajinagar Ganesh Mahasangh : श्री गणेश महासंघाच्या कार्यक्रमात राजकीय नाट्य

अध्यक्षपद उबाठाकडे असल्याने शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी
Chhatrapati Sambhajinagar Ganesh Mahasangh
गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्गाटन करताना पैठणचे आ. विलास भूमरे यांच्यासह संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार व मान्यवर.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दांडी मारली. केवळ पैठणचे आ. विलास भुमरे यांची उपस्थिती होती. खा. संदीपान भूमरे हे देखील न आल्याने ऐनवेळी आ. भूमरे यांच्या हस्ते समिती कार्यालयाचे उद्घाटन करावे लागले. दरम्यान, महासंघाचे अध्यक्षपद यंदा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने शिंदे गटाच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली होती.

पावसामुळे खा. भूमरे येऊ शकले नाही. तर दुपारी चार वाजताची वेळ सोयीची नव्हती आणि पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता आले नाही, असे पालकमंत्री शिरसाट यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar Ganesh Mahasangh
Sambhajinagar Ganeshotsav 2026 : धावणी मोहल्ल्यातील बाप्पाला १६ वर्षापासून नसीर भाईंकडून पुष्पहार !

यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आ. भुमरे, महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, बाळासाहेब थोरात, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांच्यासह पदाधिकारी व पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त अमोल येडगे उपस्थित होते.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त पवार यांनी गतवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने, शांततेत आणि शिस्तीत साजरा करा. गणेश मंडळांनी डीजेऐवजी ढोल, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावे. दोन महिने सराव करणाऱ्या कलावंताना व्यासपीठ द्या. दोन बेस दोन टॉपच्या नावाखाली नियमांचे उल्लघन केले तर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

Chhatrapati Sambhajinagar Ganesh Mahasangh
Sambhajinagar air quality : स्वच्छ वायू सर्वेक्षणात संभाजीनगरची झेप

सर्व डीजे ऑपरेटरची यादी पोलिसांकडे उपलब्ध असून, नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

वाईट नजर ठेवणाऱ्यांचा सत्यानाश होवो : विलास भुमरे

कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बोलताना आमदार भुमरे यांनी राजकीय बाण सोडला. "महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे, राज्यावरील संकटे टळू देत आणि आमच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्यांचा सत्यानाश होवो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना, असे विधान त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news