Chhatrapati Sambhajinagar cylinder blast : भारतनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ; जीवितहानी नाही
Chhatrapati Sambhajinagar cylinder blast
गॅस सिलेंडरच्या स्फोटात घरातील जळून खाक झालेले साहित्य.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगरला लागून असलेल्या भारतनगर भागात मंगळवारी (दि.६) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास एका त्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत घराचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भारत नगरमधील एका त्र्याच्या घरात रात्री सव्वाअकरा वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून सिडको आणि पदमपुरा अग्निशमन केंद्राच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Chhatrapati Sambhajinagar cylinder blast
Sambhajinagar water wastage : पाणी बचतीचे आवाहन; उधळपट्टी सुरूच

ड्युटी अधिकारी चेतन तरोळे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशामक जवान अब्दुल वासे, योगेश दुधे, अमीर शेख, आकाश नेरकर आणि वाहनचालक विजय दुबेले यांनी पाण्याचा मारा करत शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले.

जवानांच्या या तत्परतेमुळे आग आजूबाजूच्या दाट लोकवस्तीत पसरली नाही. या स्फोटात आणि आगीत पत्र्याच्या घराचे व आतील सामानाचे नुकसान झाले आहे, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Chhatrapati Sambhajinagar cylinder blast
Sambhajinagar Crime : १३ वर्षे तपासात दिरंगाई, ५० तक्रारी, तरीही न्याय नाही; फिनिक्स क्लासेसच्या संचालकाने जीवन संपवले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news