

छत्रपती संभाजीनगर : हौसेला मोल नसते, असे म्हणतात अगदी तसेच छत्रपती संभाजीनगरवासीयांचे झाले आहे. कोणी आपला पसंतीचा क्रमांक किंवा पूर्ण क्रमांकांची बेरीज आपल्या पसंती क्रमांकाची आली पाहिजे यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. २०२५ या वर्षभरात चारचाकी किंवा दुचाकीच्या पसंती क्रमांकासाठी तब्बल ११ कोटी ७९ लाख रुपये मोजल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
घेताना आपल्या अनेक वाहनधारक नवीन वाहन पसंतीच्या क्रमांकासाठी धडपड करत असतात. त्या क्रमांकासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातून ऑनलाईन मागील वर्षभरात ८ हजार ६२९ पसंती क्रमांकांसाठी शहरवासीयांनी ११ कोटी ७९ लाख रुपये भरल्याची माहिती काठोळे यांनी दिली.
गत दोन वर्षांच्या तुलनेत वाढ
पसंती क्रमांकाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. यामुळे मागणी कमी होईल, असे वाटत होते, परंतु गत दोन वर्षीच्या तुलनेत यावर्षी पसंती क्रमांकाची मागणी वाढली आहे. २०२३ मध्ये ७ हजार २१४ वाहनधारकांनी पसंती क्रमांक घेतले. यातून आरटीअ-ोला ६ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल मिळाला तर २०२४ मध्ये ८ हजार १८५ वाहनधारकांच्या पसंती क्रमांकातून ९ कोटी ६१ लाख ६३ हजार तर २०२५ मध्ये ८ हजार ६२९ पसंती क्रमांकातून ११ कोटी ७९ लाख रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती काठोळे यांनी दिली.
०००४ पाठोपाठ ०३०३ क्रमांकाची भुरळ
दरम्यान, वाहनधारक आपला लकी किंवा आवडीचा क्रमांक म्हणून ४ नंबरची मागणी मोठ्या प्रमाणात करत असल्याचे एकंदरीत आकडेव-ारीवरून दिसून आले. सिंगल ४ किंवा ४४, तसेच ०३०३ या क्रमांचीही भुरळ मोठ्या प्रमाणात दिसून आली. या पाठोपाठ ९९९९, ७७७७० ५५५ किंवा ३३३ अशा क्रमांकालाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे वर्षभराच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.