छत्रपती संभाजीनगर : आजी, तुमची लॉटरी लागली आहे; आमिष दाखवून वृद्धेच्या ३ तोळ्यांच्या बांगड्या लुबाडल्या

Chhatrapati Sambhajinagar - हसूल परिसरात भरदुपारी घडला प्रकार; तोतयाविरुद्ध गुन्हा दाखल
भामटा कमलाबाई यांना दुचाकीवर घेऊन आला. बाजूला रस्त्याकडे तोंडकरून उभी दुचाकी दिसत आहे. त्यानंतर त्याने मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून त्यांच्याकडून सोन्याच्या बांगड्या घेताना सीसीटीव्हीत कैद झाला.
भामटा कमलाबाई यांना दुचाकीवर घेऊन आला. बाजूला रस्त्याकडे तोंडकरून उभी दुचाकी दिसत आहे. त्यानंतर त्याने मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून त्यांच्याकडून सोन्याच्या बांगड्या घेताना सीसीटीव्हीत कैद झाला.
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आजी, तुमची लॉटरी लागली असून, माझ्यासोबत चला, मी तुम्हाला पैसे काढून देतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने ६८ वर्षीय वृद्धेच्या हातातील तब्बल ३ तोळ्यांच्या सोन्याच्या चार बांगड्या लुबाडून पोबारा केला. ही घटना रविवारी (दि. २६) दुपारी २ वाजेच्या सुमारास राजधानी हॉटेलजवळ, हर्मूल भागात घडली. या प्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कमलबाई सुखदेव शिंदे (६८, रा. शिवेश्वर कॉलनी, भगतसिंगनगर रोड, हर्मूल) यांच्या तक्रारीनुसार त्या रविवारी सकाळी कायगाव टोका येथे गेल्या होत्या. तेथील काम आटोपून दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्या हर्मूल टी-पॉइंट येथे बसमधून उतरल्या व पायी घराकडे निघाल्या. घराजवळील स्वामी समर्थ मेडिकलमधून कानातील मळ काढण्याची स्टिक घेण्यासाठी त्या जात असताना एक अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने 'आजी तुमची लॉटरी लागली आहे, माझ्यासोबत चला मी पैसे काढून देतो,' अशी थाप मारली.

कमलबाई यांनी 'मी कोणतीही लॉटरी घेतलेली नाही, माझ्या मुलाला बोलावते,' असे सांगितले असता भामट्याने 'मुलाला बोलावण्याची गरज नाही, माझ्यावर विश्वास ठेवा,' असे म्हणत गोड बोलून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर आरोपीने वृद्धेला स्वतःच्या दुचाकीवर बसवून हसूल येथील राजधानी हॉटेलजवळ आणले. येथे तुम्हाला लॉटरीचे पैसे मिळणार आहेत, पण त्या साहेबांना दाखवण्यासाठी तुमच्या हातातील बांगड्या काढून द्या, असे सांगून भामट्याने त्यांना भुरळ पाडली.

भामटा कमलाबाई यांना दुचाकीवर घेऊन आला. बाजूला रस्त्याकडे तोंडकरून उभी दुचाकी दिसत आहे. त्यानंतर त्याने मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून त्यांच्याकडून सोन्याच्या बांगड्या घेताना सीसीटीव्हीत कैद झाला.
Chhatrapati Sambhajinagar Rozabagh case | अटकेचा कायदेशीर पेच अखेर सुटला; तरुणाच्या खूनप्रकरणी सहा आरोपींना ३१ पर्यंत पोलिस कोठडी

कमलबाई यांनी हातातील ३ तोळ्यांच्या सोन्याच्या चार बांगड्या काढून दिल्या. बांगड्या घेऊन आरोपी मागे गेला व थोड्या वेळात परत येऊन तुम्ही मागे बँकेत जा आणि बांगड्या व लॉटरीचे पैसे घेऊन या, असे सांगितले. कमलबाई बँक शोधण्यासाठी गेल्या असता, तिथे कोणतीही बँक नसून केवळ एक हॉटेल असल्याचे त्यांना दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मागे वळून पाहिले, मात्र तोपर्यंत भामट्याने तेथून पोबारा केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सचिन सदाफुले करत आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद

आरोपीने अंगात रेनकोट, तोंडाला मास्क लावलेला होता. स्पोर्ट बाईकला नंबरही नव्हता. सतत मोबाईलवर बोलण्याचे नाटक करू लागला. कमलबाई याना तिथे बसविल्यानंतर त्याने मोबाईलवर बोलत बोलतच सोन्याच्या बांगड्या घेतल्या. तेथून बँकेकडे जाऊन आल्याचा भास निर्माण करून पुन्हा कमलबाई यांच्याकडे येऊन त्यांना तुम्ही मागे असलेल्या बँकेतून तुमच्या बांगड्या आणि लॉटरीचे पैसे घ्या, असे म्हणाला. कमलबाई उठून मागे जाताच त्याने तेथून दुचाकीने धूम ठोकली.

भामटा कमलाबाई यांना दुचाकीवर घेऊन आला. बाजूला रस्त्याकडे तोंडकरून उभी दुचाकी दिसत आहे. त्यानंतर त्याने मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून त्यांच्याकडून सोन्याच्या बांगड्या घेताना सीसीटीव्हीत कैद झाला.
Aadhaar rule impacts teachers - 'आधार' नाही तर शिक्षक नाही, संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news